omicron variant : कर्नाटकातील त्या रुग्णांच्या संपर्कातील ५ जणांना कोरोना - पुढारी

omicron variant : कर्नाटकातील त्या रुग्णांच्या संपर्कातील ५ जणांना कोरोना

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन

कोरोनाचा नव्या व्हेरियंटचे (omicron verint ) दोन रुग्ण कर्नाटकात सापडल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णांच्या संपर्कातील पाच लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे किंवा नाही यासाठी जिनोम सिक्वेंन्सिसकडे नमुने पाठविण्यात आले आहेत.

कर्नाटकातील ६६ आणि ४६ वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्यात आली असून ते सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र, त्यांना व्हेरियंटची लागण झाली आहे की नाही याबाबत अद्याप अहवाल आलेला नाही.

बुधवारी रात्री संबधित दोन व्यक्तींना कोरोना लागण झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, आपल्याला भीतीदायक वातावरण तयार करायचे नाही. सरकार सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे.

आईसीएमआरचे डीजी बलराम भार्गव म्हणाले, आरोग्य मंत्रालयाद्वारे उभारण्यात आलेल्या ३७ प्रयोगशाळांत इंसाकाँग कंसोर्टियमच्या जिनोम सिक्वेसिंग द्वारे ओमिक्रॉनचे निदान केले आहे. आपल्याला घाबरण्याची गरज नाही. कोरोना नियमावलींचे पालन केले पाहिजे.

omicron verint गंभीर लक्षणे नाहीत

केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल म्हणाले, ओमायक्रॉन व्हेरियंट ची लागण झालेल्यांमध्ये गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. त्यांना किरकोळ लक्षणे आहेत. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये. आत्तापर्यंत २९ देशांत ३७३ रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा :

Back to top button