प्रौढांसाठी 'वर्क फ्रॉम होम', तर लहान मुले शाळांत कशाला ?; सर्वोच्च न्यायालयाची दिल्‍ली सरकारला विचारणा - पुढारी

प्रौढांसाठी 'वर्क फ्रॉम होम', तर लहान मुले शाळांत कशाला ?; सर्वोच्च न्यायालयाची दिल्‍ली सरकारला विचारणा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना तसेच वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रौढांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु करण्यात आले आहे. तर मग अशावेळी लहान मुलांसाठी शाळेत येण्याचा आग्रह का धरला जात आहे, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी दिल्ली सरकारला केली.

प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे दिल्ली सरकार तसेच केंद्र सरकारकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही, असे मत यावेळी न्यायालयाने नोंदवले. प्रदूषणाच्या मुद्द्यावरून याआधीही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार तसेच दिल्ली प्रशासनामधील अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. आम्ही हे उपाय करीत आहोत, ते उपाय करीत आहोत असे सांगितले जात आहे. तर मग प्रदूषण का वाढत आहे, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी विचारणाही सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केली.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button