Neeraj Chopra याने ऑलिम्पिकमध्ये प्रतिस्पर्ध्यांना प्रोत्साहन का दिलं?; मोठा खुलासा | पुढारी

Neeraj Chopra याने ऑलिम्पिकमध्ये प्रतिस्पर्ध्यांना प्रोत्साहन का दिलं?; मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने भालाफेकपटू म्हणून करियरची सुरुवात कशी केली याबाबत खुलासा केला आहे. ”टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) यांच्या सुवर्ण कामगिरीमुळे मला प्रेरणा मिळाली. आपण ऑलिम्पिक पदक जिंकू शकतो, असा विश्वास त्यांनी मला दिला. आपण ऑलिम्पिक पदक जिंकू शकत नाही, हा भारतीयांच्या मनातील संभ्रम त्यांनी दूर केला.” असे नीरजने हिंदुस्तान टाइम्स लीडरशीप समिटच्या १९ व्या पर्वात बोलताना सांगितले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपण प्रतिस्पर्ध्यांना प्रोत्साहन का दिले याबद्दल नीरज चोप्रा म्हणाला की, प्रत्येकजण एकमेकांना चिअर करतो. आपण आपल्यापरीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि पण आपण प्रत्येकाला प्रोत्साहन दिले पाहिजे.”

आपल्या करियरच्या सुरुवातीचे काही क्षण सांगताना नीरजने (Neeraj Chopra) म्हटले की, मी खोडकर मुलगा होतो. माझ्या काकांची इच्छा होती की मी स्पोर्ट्स ऐवजी दुसऱ्या क्षेत्रात करियर करावे. कारण आमची कोणाचीही खेळाडू म्हणून पार्श्वभूमी नव्हती. मला माहीत नव्हते की कोणते क्षेत्र निवडावे. पण मला भालाफेक खेळ आवडत होता. यामुळे या खेळाकडे मी वळलो. या खेळाविषयी खूप कमी लोकांना माहीत होते. मला वाटत होते की याची रोज प्रॅक्टिस करावी. त्यानंतर मी ट्रेनिंगसाठी गेलो. ट्रेनिंगची एवढी मला आवड लागली की एक दिवस जरी ट्रेनिंगसाठी गेलो नाही तर मी काहीतरी मिस केले आहे असे वाटायचे.

‘नीरजनं सुवर्णपदक जिंकल्यानंतर अधिक खूश झालो होतो’

या कार्यक्रमात बोलताना अभिनय बिंद्राने म्हटले की, जेव्हा मी सुवर्णपदक जिंकले तेव्हा पत्रकार परिषदेत एक प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणजे, मला आशा आहे की माझी ही कामगिरी इतर भारतीय खेळाडूंना मार्ग दाखवेल. मी सुवर्णपदक जिंकल्यापेक्षा नीरजने सुवर्णपदक जिंकल्यानंतर अधिक खूश झालो होतो. मी जिथे जाईल तिथे माझी सुवर्णपदक जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू म्हणून ओळख करुन दिली जायची. पण आता नीरजच्या सुवर्णपदकामुळे अनेकांना ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी दिशा मिळाली. आम्हाला निश्चितपणे आणखी पदके मिळायला हवीत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : गोल्डन बॉय नीरज चोपडा भारावला आपले मोझॅक पोर्ट्रेट बघून | Mosaic portrait of neeraj chopra

Back to top button