Pune Suicide : सगळीकडून माझे मरण झाले, सरपंच, उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या - पुढारी

Pune Suicide : सगळीकडून माझे मरण झाले, सरपंच, उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या

ओतूर (पुणे) : पुढारी वृत्तसेवा : Pune Otur Suicide : ओतूरपासून सुमारे सात किलोमीटरवर असलेल्या अहिंनवेवाडी (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायत कार्यालयातच ग्रामपंचायत शिपायाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. आत्महत्येपूर्वी मयत इसमाने दोन सुसाईड नोट स्वतःच्या खिशात लिहून ठेवल्यामुळे आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे.

सरपंच व उपसरपंच यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रकाश शिवराम गोंदे (वय ४७, रा. अहिंनवेवाडी, गोंदेवाडीझ ता. जुन्नर) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे.

प्रकाश गोंदे हे सन २००१ पासून अहिंनवेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांना सन २०२० मध्ये अर्धांगवायूचा झटका येऊन गेल्यामुळे त्यांचे अर्धे शरीर काम देत नव्हते.

Drug Smugglers : पश्चिम महाराष्ट्र, सीमाभागात ड्रग्ज तस्कर सक्रिय; सीमाभागात कोट्यवधींच्या उलाढाली

Pune Otur Suicide : सरपंच उपसरपंचांकडून पगार देण्यास टाळाटाळ

दरम्यान त्यांनी (दि.२५) नोव्हेंबर २०२१ रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, माझ्या पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यास सर्वस्वी सरपंच भीमाबाई नंदकुमार खंडांगळे व उपसरपंच स्वप्नील वसंत अहिंनवे हेच जबाबदार आहेत. ही तक्रार त्यांनी ओतूर पोलिस स्टेशनला दिली आहे.

दरम्यान तू काम नीट करीत नाही, जमत नसेल तर घरी बस असे बोलून उपसरपंच स्वप्नील अहिंनवे हे नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. मला दवाखान्यात जाण्यासाठी लागणारा भत्ता व माझा बाकी पगारातील असलेला पगार देण्यास सरपंच आणि उपसरपंच नकार देत देतात.

सगळीकडून माझे मरण झाले आहे, जर मी मेलो तर माझ्या मुलाबाळांना राहणीमान भत्ता त्यांनी काढून द्यावा. नाही तर त्यांचे पैकी देखील कोणी आत्महत्या करतील,अशा प्रकारचा मजकूर सुसाईड नोटमध्ये मयत प्रकाश यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या पश्चात आई खेमाबाई, पत्नी नंदा, मुलगी प्रतीक्षा (वय १४) व मुलगा प्रतीक (वय १२) असा परिवार आहे.

Back to top button