वेध शेअर बाजाराचा : निवडणुकीच्या धामधुमीतही बाजारात तेजी | पुढारी

वेध शेअर बाजाराचा : निवडणुकीच्या धामधुमीतही बाजारात तेजी

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

गुरुवार दिनांक 25 एप्रिल रोजी प्रमुख निर्देशांकांची (Sensex आणि Nifty) 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिली Monthly Expiry पार पडली. सोमवार दिनांक 29 आणि मंगळवार दिनांक 30 एप्रिल हे या महिन्यातील आणखी दोन दिवस ट्रेडिंगचे आहेत. परंतु शुक्रवार दिनांक 26 एप्रिलपर्यंतचा बाजाराचा मासिक आढावा घेतला तर निफ्टी 1.34 टक्के, सेन्सेक्स 1 टक्का आणि निफ्टी बँक सध्या तीन टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. काहीच दिवसांपूर्वी सेबीच्या प्रमुखांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये बुडबुडा निर्माण झाल्याचा इशारा देऊनही मिड कॅप इंडेक्स जवळपास सहा टक्क्यांनी, तर स्मॉल कॅप इंडेक्स साडेबारा टक्क्यांनी वाढला.

संबंधित बातम्या : 

एप्रिल महिन्यातील या तेजीचाही एक विशेष आहे. सात टप्प्यांमधील लोकसभेची निवडणूक सुरू आहे. 4 जून रोजी मतमोजणी होऊन तिचा निकाल लागेल. असे असूनही बाजारात चढउतार अनुभवास येण्याऐवजी तेजी दिसून येते आहे. कदाचित मतमोजणी जवळ येईल तशी बाजारातही असंदिग्धता वाढू लागेल.

एप्रिल महिन्यातील तेजीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निफ्टी आयटी इंडेक्स वगळता सर्व Sectaral Indicies सुद्धा तेजीत होते. Nifty PSE, Nifty CPSE, NIfty Realty, Nifty PSU Rank या निर्देशांकांनी बाजार वाढवण्यास हातभार लावला. परंतु या महिन्याचा सुपरस्टार ठरला तो छळषीूं ाशींरश्र ळपवशु 13 टक्क्यांहून अधिक. इतकेच नाही, तर इंडेक्समधील एकूण 15 पैकी तब्बल 11 कंपन्यांचे शेअर्स 52 थशशज्ञ कळसह च्या पातळीवर आहेत. या 11 शेअर्सनी एका वर्षांत गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. वर्षभरात सर्वात अधिक परतावा कळपव उरिशिी या शेअरने दिला आहे. एका वर्षात 300 टक्के परतावा एका वर्षापूर्वी रु. 98 आत असणारा हा शेअर आज रु. 391 वर ट्रेंड करतो आहे.

निफ्टी मेटलप्रमाणेच निफ्टी पीएसई या सरकारी कंपन्यांचा समावेश असलेल्या इंडेक्सने मागील एका वर्षात 113 टक्के रिटर्नस दिले आहेत. याच धर्तीवर RSE थीम असलेले The matic फंड बाजारात आहेत. त्यांची ही गेल्या वर्षभरातील कामगिरी पहा.

SBI PSU Fund 97%
ABSL PSU Equity Fund 97.17%
Invesco India ASU Equity Fund 87.45%
ICICI Pry PSU Equity Fund 83.43%

शेअर बाजारात पैसे मिळविण्यासाठी आकाश-पाताळ एक करावे लागत नाही. फक्त बाजारातील ट्रेंड ओळखणे आणि त्यानुसार मोठ्या साधनात गुंतवणूक करून संयम राखणे महत्त्वाचे.
8 एप्रिल 2024 पासून छडए नेफ्यूचर्स अँड ऑप्शनसमधील ट्रेडिंगसाठी चार नवे निर्देशांक स्थापित केले. ते खालीलप्रमाणे आहेत.

1) Nifty Tata Group 25% Cap Index
2) Nifty 500 Multicap India Manafacturing 50:30:20 Index
3) Nifty 500 Multicap Infractructure 50:30:20 Index
4) Nifty Midsmall Healthcare Index

या नवीन निर्देशांकाच्या स्थापनेबरोबर एनएसईने तीन निर्देशांकाच्या ऋ 30 लॉट साईजमध्ये बदल केला आहे व त्यानुसार निफ्टी 50 चा लॉट साईज 50 वरून 25 वर निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस 50 वरून 25 आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट 75 वरून 50 वर आणण्यात आला आहे. हा बदल 26 एप्रिलपासून लागू केला आहे.

आता आगामी मे महिन्यातील बाजाराविषयी

सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे निवडणुकीच्या धामधुमीतही एप्रिल महिन्यात बाजार तेजीत होता; परंतु 4 जून ही निवडणूक निकालाची तारीख जवळ येईल, तशी बाजारातील अनिश्चितता वाढेल. त्यामुळे दीर्घकालीन ते मध्यमकालीन गुंतवणूक निकालानंतर केलेली बरी. ट्रेडर्सनीही फार मोठे आणि जोखमीचे ट्रेडर्स टाळावेत कारण शेवटी Capitl protection महत्त्वाचे.

हेही वाचा : 

Back to top button