गुंतवणूकदारांनो, KYC पूर्ण केलीय का? जाणून घ्या प्रक्रिया | पुढारी

गुंतवणूकदारांनो, KYC पूर्ण केलीय का? जाणून घ्या प्रक्रिया

अनिल पाटील, प्रवर्तन, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

आरबीआयने देशातील सर्व आर्थिक संस्थांना (Financial Institute) ग्राहकांना कोणतीही आर्थिक व्यवहार करण्याची सेवा देण्यापूर्वी कस्टमर ड्यू डिलिजेन्स (CDD) नियमांतर्गत केवायसी (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे.

संबंधित बातम्या : 

सेबीच्या नियमानुसार 1 एप्रिल 24 पासून केवायसीचे नवीन नियम लागू झालेले आहेत. आपण जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल, तर आपला स्टेटस चेक करायला हवा. जर केवायसीची पूर्तता केली नसेल, तर परत एकदा आपली कागदपत्रे सादर करून केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.

याबाबतीत आपण गाफील राहाल, तर आपल्यासाठी आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात. दर महिन्याला एसआयपी गुंतवणूक बंद होऊ शकते आणि पैसे काढण्यासाठीदेखील आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यासाठी वेळीच जागे होणे गरजेचे आहे.

केवायसी प्रक्रिया

आपल्या केवायसी स्टेटस करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन आपला PAN CARD नंबर टाकून चेक करावे. जर तुमची म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला चार प्रकारचे निष्कर्ष दिसतील. REJECTED, ON HOLD , REGISTERED, VALIDATED

1) जर तुमचा केवायसी स्टेटस KYC IS ON REJECTED असे दिसत असेल, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल, त्यावेळी केवायसीचा फॉर्म भरून दिल्यानंतर तुमच्या कागदपत्रे त्रुटी असतील, तर तुमची केवायसी रिजेक्टेड म्हणून दाखवली जाते. त्यासाठी परत एकदा अधिकृत कागदपत्रे सादर करून तुमची केवायसी व्हॅलिडेट करून घेतली पाहिजे.

2) जर तुमच्या केवायसीचा स्टेटस KYC IS ON HOLD असा निष्कर्ष असेल, तर तुम्ही दिलेली कागदपत्रे अपुरी आहेत, असा अर्थ होतो. या अवस्थेत मात्र तुम्हाला कोणताही आर्थिक व्यवहार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे, वर्ग करणे, पैसे काढून घेणे वगैरे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. तुमची केवायसी अपुरी आहे ती अधिकृत कागदपत्रे सादर करून केवायसी केलीच पाहिजे. जर तुम्ही दुर्लक्ष केले आणि तुम्हाला आपली गुंतवणूक काढायची असेल, तर नेमक्या वेळी तुमची आर्थिक व्यवहार विनंती नाकारली जाऊ शकते. त्यासाठी वेळीच सावध होऊन आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी. आपली KYC VALIDATE करून घ्यावी.

3) जर तुमचा केवायसी स्टेटस KYC IS ON REGISTERED असा असेल, तर सध्या तुमची सुरू असलेली गुंतवणूक तशीच चालू राहील. एसआयपीही चालू राहतील; परंतु नवीन एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमची कागदपत्रे सादर करून केवायसी पूर्तता VALIDATED करणे गरजेचे आहे.

4) जर तुमचा केवायसीचा स्टेटस KYC IS ON VALIDATED असा असेल, तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. तुमची गुंतवणूक व्यवस्थितपणे सुरू राहील आणि कधीही पैसे काढता येतील. सर्व काही व्यवहार सुरळीतपणे पार पडतील. भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करत असताना नवीन पद्धतीप्रमाणे आपली केवायसी पूर्तता करून घ्यावी. आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाइल नंबर, मेल आयडी, बँक खाते या चार ही ठिकाणी लिंक केलेली असली पाहिजे. आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, नरेगाद्वारे जारी केलेले जॉब कार्ड, नाव आणि पत्ता असलेले राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरद्वारे जारी केलेले पत्र आणि इतर कोणतेही दस्तऐवज सादर करून आपली KYC पूर्तता करणे महत्त्वाचे आहे.

अधिकृत वैध दस्तऐवज

भांडवली बाजारातील सर्व गुंतवणूकदारांचे सर्व केवायसी तपशील अधिकृतरित्या सादर करण्यास सागितले आहे. गुंतवणूकदारांचे आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार आयडी इत्यादी अधिकृतपणे वैध दस्तऐवज (OVD) OFFICIALLY VALID DOCUMENT प्रमाणित केली आहेत. केवायसी करताना गुंतवणूकदारांचा आधारकार्ड, मोबाइल नंबर, मेल आयडी, बँक खाते, पॅनकार्ड हे एकमेकांशी लिंक केलेले पाहिजे. त्याचबरोबर आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते या तीनही ठिकाणी त्या व्यक्तीचे नाव एकसारखे असले पाहिजे. स्पेलिंगमधील चुका असल्या तर चालणार नाही. तशीच तुम्ही सादर केली तर ती रिजेक्ट होऊ शकते. वरील सर्व महत्त्वाच्या दस्तऐवजांवर आपल्या नावातील बदल वेळीच करून घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा : 

Back to top button