मोठी बातमी! Omicron : कोव्हिशिल्ड मध्ये बदल करून बुस्टर डोस शक्य - पुनावाला | पुढारी

मोठी बातमी! Omicron : कोव्हिशिल्ड मध्ये बदल करून बुस्टर डोस शक्य - पुनावाला

Omicron : कोव्हिशिल्ड मध्ये बदल करून बुस्टर डोस शक्य - पुनावाला

पुढारी ऑनलाईन – दिल्ली : कोरोनाचा नवीन व्हॅरिएंट ओमायक्रॉन विराधोत कोव्हिशिल्ड ही सुधारित लस बनवून त्याचा बुस्टर डोस देता येणं शक्य आहे, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली आहे. Omicron बद्दल जादा माहिती उपलब्ध झाल्यानंतर दोन आठवड्यांनी या लस निर्मिताचा विचार केला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

“ऑक्सफर्डमधील संशोधक यावर काम करत आहेत. या संशोधनावर आधारित आम्ही नवी लस बनवू, ती बुस्टर डोस म्हणून काम करू शकेल. याचे किती डोस घ्यावे लागतील हेही नंतरच सांगता येईल,” असं ते म्हणाले.

“लान्सेटने कोव्हिशिल्डची परिणामकारकता फार चांगली असल्याचं म्हटलं आहे. या व्हॅक्सिनमुळे रुग्णालयात भरती होण्याची फारशी वेळ येत नाही. कोव्हिशिल्डची परिणामकारकता कमी होईल असे काही नाही.”

कोव्हिशिल्ड बुस्टर डोससाठी पुरेसा साठा उपलब्ध

जर बुस्टर डोसची गरज पडली तरी कंपनीकडे पुरेसे डोस उपलब्ध आहेत, आणि ते जुन्याच किंमतीत दिले जातील.

“जवळपास २०० दशलक्ष इतके डोस भारतासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. जर केंद्राने बुस्टर डोसचा निर्णय घेतला तर आमच्याकडे पुरेसा साठा आहे.”

सध्या तरी ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांना लस मिळावी हे प्राधान्य आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा

पाहा व्हिडिओ : Omicron बद्दल सविस्तर माहिती

Back to top button