corona memes: कोरोनाचा नवा व्हेरिएंट आफ्रिकेत, पण RTPCR तपासणी मात्र ‘कोगनोळी’त! | पुढारी

corona memes: कोरोनाचा नवा व्हेरिएंट आफ्रिकेत, पण RTPCR तपासणी मात्र ‘कोगनोळी’त!

अब्दुल लाट (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

‘जगात कोठेही कोरोना अपग्रेड झाल्यावर कोगनोळी, आयको आणि पाचवा मैलावर RTPCR कम्पलसरी करायचं…!!’, ‘कोरोनाचा नवीन अवतार आल्यावर काय करणार? झाडं तोडून दत्तवाडच्या पुलावर टाकून महाराष्ट्राचा रस्ता बंद करणार!आणि….दानवाडच्या पुलावर मुरूम टाकून JCB नं चर पण मारायचं…!!’… असे एकापेक्षा एक विनोदी आशयाचे मिम्स लाट, लाटवाडी, पाचवा मैल, शिवनाकवाडी, आयको, दत्तवाड, दानवाड या सीमाभागात व्हायरल झाले आहेत. या विनोदी मिम्सच्या माध्यमातून सीमाभागातील लोकांनी कर्नाटक प्रशासनाविरोधात आपल्या भावना व्यक्त केल्याचे समोर आहे.

corona memes
corona memes
corona memes
corona memes

सध्या आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे सीमाभागात कर्नाटक प्रशासनाकडून नाकाबंदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणीही सक्तीची करण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटकातील अनेक नाक्यांवर तेथील प्रशासनाकडून अरेरावी होत असल्याचे सीमाभागातील अनेकांचे म्हणणे आहे. यामुळे सीमावासीयांना नाहक त्रास होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. जगात कोणत्याही ठिकाणची कोरोनाबाबत बातमी माध्यमांमध्ये आली की, लगेच गरज नसताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक प्रशासनाकडून सीमाभाग लगत असणारे मार्ग नाकाबंदी करून तपासणी चालू केले जाताते.

corona memes
corona memes
corona memes
corona memes

याठिकाणी आरटीपीसीआरचीही सक्तीची केली जाते. तसेच नागरिकांवर देखील अरेरावीची भाषा वापरली जाते. यामुळे सीमाभागातील दररोज ये-जा करत असणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी, मालवाहतूकदार आणि प्रवाशांना कर्नाटक प्रशासनाचे असे नाकाबंदी व इतर निर्णय डोकेदुखीचे ठरत आहेत. यामुळे सीमाभागातील नेटकऱ्यांकडून कर्नाटक प्रशासनाच्या विरोधात मिम्सचा जोरदार पाऊस पडत आहे.

 

Back to top button