पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना विषाणुचा B.1.1.529 हा नवा व्हेरियंट ओमिक्राॅन खूपच धाेकादायक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने ( 'डब्ल्युएचओ' ) म्हटलं आहे. जागतिक पातळीवरील संशोधकांनी ओमिक्राॅन व्हेरियंटसंदर्भात वेगवेगळ्या बाबींच्या अभ्यास केला आहे. रोममधील बाॅम्बिगो गेसू हाॅस्पिटलने या नव्या स्ट्रेनची पहिला फाेटाे सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच त्याचं म्युटिशेन मोठ्या प्रमाणात होतं, याचीही पुष्टी केली आहे.
ओमिक्राॅनसंबंधी बोलताना संशोधक म्हणतात की, "ओमिक्राॅन हा नवा व्हेरियंट असून तो मानवी प्रजातींशी अधिक जुळवून घेतो. ओमिक्राॅनचं म्युटेशन कोरोनाच्या लसींवर आणि कोरोनाच्या प्रसारावर किती परिणाम करतं, हे आता प्रयोगशाळेत विविध प्रयोगांद्वारेच सिद्ध होऊ शकेल", असंही संशोधक सांगतात.
जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा आणि ओमिक्राॅन यांचा तुलनात्मक ट्विटरवरून शेअर केला आहे. पण, डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्राॅन किती धोकादायक आणि कसा प्रसारित होतो, यांसदर्भात स्पष्ट माहिती दिलेली नाही. दक्षिण आफ्रिकेतील लोकांच्या कोरोना टेस्ट मोठ्या प्रमाणात पाॅझिटिव्ह आलेल्या आहेत. पण, त्यामध्ये ओमिक्राॅन हा नवा व्हेरियंट आहे की इतर कुठला व्हेरियंट, यासंदर्भात अजूनही प्रयोगशाळेत संशोधन सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, "ज्यांना पहिल्यांदा कोरोना होऊन गेलेला आहे, त्यांना ओमिक्राॅनच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. मात्र, त्यासंदर्भात माहिती खूपच कमी आहे. पुढील काही दिवसांत त्याची सविस्तर माहिती आपल्याला मिळू शकते. असं असलं तरी, कोरोनाने मृत्यू पावणाऱ्यांचा दर कमी करण्यासाठी लसीकरण खूप महत्त्वाचं आहे. कारण, सध्या डेल्टा व्हेरियंट हा जास्त प्रभावी आहे. याच्या विरोधात कोरोनाची लस अत्यंत महत्त्वाची आहे."