omicron corona new variant : 'ओमायक्रॉन' व्हेरियंट डेल्टापेक्षा खरंच धोकादायक आहे का?, WHO कडून ५ मुद्द्यांमध्ये स्पष्टीकरण | पुढारी

omicron corona new variant : 'ओमायक्रॉन' व्हेरियंट डेल्टापेक्षा खरंच धोकादायक आहे का?, WHO कडून ५ मुद्द्यांमध्ये स्पष्टीकरण

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : omicron corona new variant : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या सल्लागार समितीने ‘ओमायक्रॉन’ हा नवा व्हेरियंट धुमाकूळ घालण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, ओमायक्रॉन या विषाणूचे नाव ग्रीक भाषेत ठेवण्यात आले आहे. या विषाणूचे पहिले रूग्ण दक्षिण अफ्रिकेत आढळले आहेत. तेथील तज्ज्ञांच्या माहितीनुसार या विषाणूची लक्षणे डेल्टापेक्षा वेगळी असल्याचे सांगितले आहे.

डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, डेल्टापेक्षा या विषाणूचा प्रभाव अधिक आहे. ज्या लोकांना यापूर्वी कोरोना संसर्ग झाला आहे त्यांना ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो. या प्रकारात पुन्हा संसर्ग होण्याचा धोका कायम आहे.

omicron corona new variant : WHO कडून दिलेल्या सूचना

डेल्टा आणि कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा ‘ओमायक्रॉन’ अधिक संक्रमणक्षम (एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पसरते) आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या ते फक्त आरटी-पीसीआर चाचणीद्वारे शोधले जाऊ शकते. कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ प्रकाराचा कोविड-19 लसीवर काय परिणाम होईल हे शोधण्यासाठी WHO सध्या काम करत आहे.

‘ओमायक्रॉन’च्या संसर्गामुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतो की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.

‘ओमायक्रॉन’शी संबंधित लक्षणे इतर प्रकारांपेक्षा वेगळी आहेत. याबाबत अजुनही संशोधन झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की दक्षिण आफ्रिकेत रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांची संख्या वाढली आहे.

अफ्रिकेत लोकांच्या वाढत्या संख्येमुळे देखील कोरोनाचा फैलाव झाला आहे.

परंतू ओमायक्रॉनची लक्षणे असलेले हे रुग्ण आहेत का याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नाही.

कोरोनाच्या या प्रकाराचे गांभीर्य समजण्यासाठी अनेक दिवस किंवा अनेक आठवडे लागू शकतात. असे WHO कडून सांगण्यात आले आहे.

Back to top button