LPG Price Hike : मार्चच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका; व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क :  तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती आजपासून २५ रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ किंमत रु. १७९५ प्रति सिलेंडर आहे. ( LPG Price Hike)

मार्च महिना आजपासून सुरु झाला आहे आणि महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ मार्च २०२४ पासून मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. (LPG सिलेंडरची किंमत वाढ). म्हणजेच १ मार्च २०२४ पासून सिलिंडर महाग झाला आहे.  तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. दिल्लीत २५ रुपयांनी तर मुंबईत २६ रुपयांनी महागले आहे.

LPG Price Hike : नवे दर असे आहेत?

तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करून  व्यावसायिक गॅस सिलिंडर ग्राहकांना धक्का दिला आहे. गेल्या महिन्यात अर्थसंकल्पाच्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यात १४ रुपयांनी वाढ केल्यानंतर आता सिलिंडरची किंमत एकदम २५ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. बदललेले दर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड  (IOCL-Indian Oil Corporation Limited )च्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे दर आजपासून  लागू आहेत. नवीन दरानुसार, राजधानी दिल्लीत एक व्यावसायिक सिलिंडर १७९५ रुपयांना उपलब्ध होईल,  कोलकातामध्ये हा सिलेंडर आता १९११ रुपयांचा झाला आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचा दर १७४९ रुपयांवर, तर चेन्नईमध्ये १९६०.५० रुपयांनी उपलब्ध आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news