Bangladesh fire : बांगलादेशमधील ढाकामध्ये इमारतीला आग; ४३ जणांचा होरपळून मृत्यू 

Bangladesh fire
Bangladesh fire

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका सहा मजली इमारतीला गुरुवारी (दि.२९) रात्रभर लागलेल्या भीषण आगीत किमान ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २२ लोक जखमी झाले आहेत. अशी माहिती बांगलादेशाच्या आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 13 गाड्यांना सुमारे अडीच तास लागले.(Bangladesh fire)

माहितीनुसार, बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी (दि.२९) ग्रीन कोझी कॉटेज नावाच्या सहा मजली इमारतीला  भीषण आग लागली. यामध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला. तर २२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर ७५ लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यापैकी ४२ जण बेशुद्ध पडले आहेत. सर्वांना ढाका मेडिकल कॉलेज आणि शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Bangladesh fire : मृतांचा आकडा वाढण्याची भीती

बांगलादेशचे आरोग्य मंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी सांगितले  रात्री दहाच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील रेस्टॉरंटमध्ये आग लागली आणि ती वेगाने वरच्या मजल्यांवर पसरली. तेथे आणखी अनेक रेस्टॉरंट्स आणि कपड्यांचे दुकान होते. दुपारी १२.३० वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. पुढे असेही ते म्हणाले की, दोन्ही रुग्णालयांमध्ये २२ जणांवर उपचार सुरू आहेत.  काही मृतदेह गंभीररित्या जळाले आहेत. त्यांची ओळख पटवणे अवघड आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

बांगलादेशमध्ये यापूर्वीही आगीच्या घटना

बांगलादेशमध्ये यापूर्वीही आगीच्या घटना घडल्या आहेत. २०१२ मध्ये  कापड कारखान्याला लागलेल्या आगीत १२४ जणांचा मृत्यू झाला होता. आपला जीव वाचवण्यासाठी कारागिरांनी नऊ मजली उंच इमारतीवरून उडी मारली. इमारतीवरून पडल्याने अनेकांचा मृत्यूही झाला. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात आले होते. २०१९ मध्ये  २२ मजली इमारतीला आग लागली होती. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये श्रीलंकन ​​नागरिकांचाही समावेश आहे. सुमारे १०० जणांना वाचवण्यात यश आले. आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरमधून इमारतीवर पाण्याची फवारणीही करण्यात आली होती. त्याचप्रमाणे फेब्रुवारी २०१९ मध्ये अपार्टमेंट आणि केमिकल गोदामाला आग लागली होती. यामध्ये ११० जणांना आपला जीव गमवावा लागला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news