

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका uttar pradesh election जवळ येतील तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपच्या लाटेत उद्ध्वस्थ झालेल्या समाजवादी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अपना दलआणि राष्ट्रीय लोकदल पक्षाशी आघाडी करून आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम आदमी पक्षाशी चर्चा सुरू असूनही लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर भाजप बॅकफूटवर असून भाजपविरोधी पक्षांची एकजूट होताना येथे दिसून येत आहे. आज आम आदमी पक्षाचे नेते खासदार संजय सिंग यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली. उत्तर प्रदेश भाजपमुक्त करण्यासाठी समान राजकीय मुद्द्यांवर एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. अजून जागावाटपाबाबत चर्चा झालेली नाही. लवकरच निर्णय घेऊ, असे खासदार संजय सिंह म्हणाले. लखनौमधील लोहिया ट्रस्टमध्ये जवळपास ३० मिनिटे ही बैठक झाली.
अपना दल (कमेरावादी)च्या राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णा पटेल म्हणाल्या, आम्ही आज सपाचे नेते अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली. आमची आघाडी केली आहे. आमची समान विचारधारा असल्याने आमची आघाडी झाली आहे. जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी अपना दल भाजपमध्ये विलीन केल्यानंतर नाराज झालेल्या कृष्णा पटेल यांनी त्यांच्याशी फारकत घेऊन अपना दल (कमेरावादी) हा पक्ष स्वतंत्र केला. या पक्षाने आता भाजपविरोधात भूमिका घेतली आहे.
रालोदचे प्रमुख चौधरी जयंत सिंह यांनही मंगळवारी अखिलेश यादव यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली. त्यानंतर ३६ जागांवर आघाडी करण्याबाबतएकत झाले. रालोदला मागील निवडणुकीत केवळ एक जागा मिळाली होती. मुजफ्फरनगर दंगलीनंतर येथे जाट मते भाजपसोबत तर मुस्लिम मते अन्य पक्षांमध्ये विखुरल्याने तेथे चौथरी यांच्या पक्षाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत येथे मोठे बदल झाले असून रालोदला मोठी संधी आहे असे मानले जात आहे. रालोदला ३६ जागा सोडल्या असल्या तरी सहा जागांवर सपाचे उमदेवर लढतील असे ठरले आहे.
मुजफ्फरनगर, शामली, सहारनपूर, मेरठ, बुलंदशहर, बिजनौर, मथुरा या जिल्ह्यांमध्ये समाजवादी पक्षांपेक्षा रालोदला जास्त जागा हव्या आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा आहेत. मात्र, राष्ट्रीय लोकदल पक्षाचा प्रभाव सर्वच जागांवर नाही. पश्चिम यूपीमध्ये या पक्षाचा प्रभाव असून ४० जागांची मागणी सपाकडे केली होती. मात्र, सपा केवळ २५ जागा देण्यास इच्छुक होते. मात्र, अखेर ३६ जागांवर ही आघाडी ठरली असून ६ जागांवर सपाचे उमेदवारी येथे लढणार आहेत. २०१८ मध्ये कैराना लोकसभा पोटनिवहणुकीसाठी समाजवादी पक्षाच्या तबस्सूम हसन यांनी आरएलडीकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी भाजपला मात देण्यात हे दोन्ही पक्ष यशस्वी झाले होते.
हेही वाचा :