उर्फी जावेदचा पारदर्शक टॉप : नेटकरी म्‍हणाले, “तुझी हीच ओळख” | पुढारी

उर्फी जावेदचा पारदर्शक टॉप : नेटकरी म्‍हणाले, "तुझी हीच ओळख"

पुढारी; ऑनलाईन डेस्क

उर्फी जावेद फार फार तर एक आठवडा बिग बॉसच्या घरात होती; पण इंटरनेटवर चर्चेत राहावं तर फक्त उर्फीनेच. फॅशनेबल आणि त्यातही बऱ्याच वेळा विचित्र फॅशनमुळे ती ट्रोलही होत असते. उर्फीचा एका नवा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच शेअर होत आहे. उर्फीने काही दिवसांपूर्वी पारदर्शक टॉप घातला होता, त्यावरून उर्फी चांगलीच ट्रोल झाली आहे.

बॅकलेस ड्रेस, वेस्ट हाय स्लीट अशा वेगळ्या फॅशनचे कपडे घालून उर्फीने बेधडक पब्लिक ॲपिअरन्स दिला होता. यावेळी मात्र उर्फीने वेगळ्या फॅशनचा कहरच केला. मुंबई विमानतळावर येताना तिने काळ्या रंगाची पँट आणि काळा टॉप परिधान केला होता; पण हा टॉप पारदर्शक असल्याने तिचे फोटो घेण्यासाठी छायाचित्रकार आणि बघ्यांची गर्दी झाली.

उर्फीने हे फोटो तिच्या इन्स्टावरही शेअर केले आहेत. काहींनी हॉट म्हणून तिचं कौतुक केलेलं आहे, तर अनेकांना हे फोटो आवडलेले नाहीत. “असे कपडे परिधान करणे हीच या बाईची ओळख आहे, नाही तरी तिची दुसरी ओळख नाही,” अशी प्रतिक्रिया एक चाहत्याने दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

हेही वाचलंत का?

Back to top button