Robbery : नाशिकमधील मलढोण येथे भीषण दरोडा; लाखोंचा ऐवज लंपास - पुढारी

Robbery : नाशिकमधील मलढोण येथे भीषण दरोडा; लाखोंचा ऐवज लंपास

वावी (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील मलढोण येथे समृद्धी महामार्गालगत सरोदे वस्तीवर मंगळवारी (दि. 23) रात्री दीड वाजेच्या सुमारास 10 ते 12 जणांनी टोळक्याने कुटुंबातील व्यक्तींना लाथा-बु्क्क्यांनी व विटाच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. तसेच घरातील लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. (Robbery) हल्ल्यामध्ये सरोटे कुटुंबातील दोघा जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

सरोदे कुटुंबातील वाल्मिक सरोदे (50) पत्नी विमल (46), आई रखमाबाई (80) मंगळवारी रात्री घराच्या बाहेर पडवीत झोपलेले होते. त्यावेळी 10 ते 12 जण चोरटे सरोदे वस्तीवर आल्यानंतर, त्यांनी सरोदेंच्या डोक्यात बियरची बाटली फोडली, विटांचा मारा केला.

रखमाबाई यांना बाजेवरून खाली ढकलून दिले. यावेळी सरोदे कुटूंबियांनी आरडाओरड केल्यावर घरात झोपलेले मुले बाहेर आली. त्यांनी दरवाजा उघडल्यावर चोरट्यांनी त्यांच्यावरही विटांचा मारा केला.

त्यानंतर चोरट्यांच्या भीतीने दोन्ही सुना गोठ्याकडे पळल्या. मुलगा नितीन याने आई, वडिलांना गोठ्याकडे पाठवले. योगेश, तुळशीराम, नितीन, किशोर या चौघांनी दरोडेखोरांचा प्रतिकार केला. मात्र चोरट्यांनी घरात घुसून दोन कपाटे उघडून 10 ते 12 तोळे सोने लांबवले. महिलांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. (Robbery)

यांनतर सरोदे कुटुंबाने आरडाओरड करून बाजूच्या वस्तीवर मदत मागितली. त्यामुळे चोरटे रस्त्यावर पळाले. त्यातील एका चोरट्याला नितीन याने लोखंडी गज मारून खाली पाडले, त्याची दुचाकी देखील पडली. आणि तिन भावंडांनी त्याला पकडून ठेवले. बाकीचे शेतातून व दुचाकीवरून समृद्धी महामार्गाकडे पळाले.

दरम्यान वाल्मीक सरोदे व मुलगा नितीन सरोदे यांना जबर मारहाण झाल्याने हे गंभीर जखमी झाले. त्यांना सिन्नर येथे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान नाशिक येथील श्वान पथकास पाचारण करून घटनेचा सुगावा काढण्याचा प्रयत्न केला. श्वान पथकाने समृद्धी लगत पूर्वेकडे सायाळे शिवारापर्यंत मागोवा दिला. मात्र मका. सोयाबीन. कापूस पिकाचा आधार घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला.

घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी पहाटे वस्तीवर भेट दिली. वस्तीवरील दोघांचे मोबाईल गायब आहे. एका दरोडेखोराचा मोबाईल घटनास्थळी ताब्यात मिळाला आहे. पोलिसांकडून तपासाची दिशा निश्चित होत आहे. गुन्ह्यातील सहभागी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे.

संशयित दरोडेखोर ऋषीकेश राठोड (25, रा. रुई ता. कोपरगाव) हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला सिव्हिल नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Back to top button