आंबोलीत हॉटेलवर पोलिसांचा छापा; 34 जणांवर कारवाई | पुढारी

आंबोलीत हॉटेलवर पोलिसांचा छापा; 34 जणांवर कारवाई

सावंतवाडीः पुढारी वृत्तसेवा

आंबोली येथे असलेल्या घनदाट जंगलातील एका हॉटेलमध्ये सिंधुदुर्ग पोलिस व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकत पर्यटक व वेटर, हॉटेल मालकासह एकूण 34 जणांवर कारवाई केली. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरा 8.30 वा.च्या सुमारास करण्यात आली. याबाबतची फिर्याद उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पो. जगदीश रघुनाथ दुधवडकर यांनी दिली आहे.

त्यानुसार परवाना नसताना मद्य पिणे, अश्लील हावभाव करीत नृत्य करणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे आदी कलमान्वये सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांना सायंकाळी येथील न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी 7500 रु.च्या सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली.

आंबोली येथील थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलवर बेकायदेशीररीत्या पार्टी चालू असल्याची टीप अज्ञाताकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकत सापळा रचून कारवाई केली.

 

परप्रांतीय 18 पुरुष आणि
10 युवतींना ताब्यात

विदेशी दहा बाटल्या दारूसह साहित्य जप्त

मद्यधुंद अवस्थेत अश्लील नृत्य

 

Back to top button