Sangli Crime : पोलिसाचे विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य; इस्लामपूरमधील धक्कादायक प्रकार | पुढारी

Sangli Crime : पोलिसाचे विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य; इस्लामपूरमधील धक्कादायक प्रकार

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

Sangli Crime : गर्लफ्रेंड सोबतचे संबंध घरी सांगण्याची धमकी देत येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यासोबत पोलिसानेच अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा नराधम पोलीस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर (वय ३४) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसी खात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या प्रकाराची व्हिडिओ क्लीप तयार करुन ती व्हायरल करण्याची धमकी देत त्या विद्यार्थ्याकडे पुन्हा अशा कृत्याची मागणी केल्यानंतर या विद्यार्थ्याने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले. हा प्रकार २९ ऑक्टोबर रोजी घडला होता. याबाबत उपअधीक्षक पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की. दि. २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता पीडित विद्यार्थी हा आपल्या गर्लफ्रेंडला भेटून रुमवर चालला होता. त्यावेळी नाईट राऊंडला असलेला पोलीस हणमंत देवकर व त्याच्या साथीदाराने त्याला अडविले. त्याच्याकडे पुर्ण चौकशी करुन त्याचा मोबाइल नंबर घेवून त्याला सोडून दिले. (Sangli Crime)

त्यानंतर दि. २९ रोजी देवकर हा फोन करुन त्या विद्यार्थ्याच्या रुमवर गेला. त्याने त्या विद्यार्थ्याला तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी शरीरसंबंध ठेवण्यास सांग. नाहीतर तुझ्यावर गुन्हा दाखल करुन हा सर्व प्रकार घरी सांगेन, अशी धमकी दिली. याला नकार दिल्याने देवकर याने त्याच्याकडे पैशाची व अनैसर्गिक कृत्याची मागणी केली. ४ हजार रुपये घेवून त्याने बळजबरीने त्याच्याशी अनैसर्गिक कृत्यही केले. शिवाय या प्रकाराची चोरुन व्हिडिओ क्लिपही तयार केली.

ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत नराधम देवकर याने पुन्हा त्या विद्यार्थ्याकडे अशा कृत्याची मागणी केली. त्यामुळे त्या विद्यार्थ्याने जिल्हाप्रमुख दीक्षित गेडाम व माझ्याकडे तक्रार केली. या प्रकाराची शहानिशा केल्यानंतर रविवारी रात्री देवकर याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्याचे उपअधीक्षक पिंगळे यांनी सांगितले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : सिंधुदुर्ग : डुकरासाठी लावलेल्‍या फासकीत अडकला बिबट्या…

Back to top button