Egg Biryani : मसालेदार अंडा बिर्याणी कशी तयार कराल? | पुढारी

Egg Biryani : मसालेदार अंडा बिर्याणी कशी तयार कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोज नाष्त्याला दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला आहे ना? किती दिवस लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली खाऊन-खाऊन वैताग आला आहे. चला तर, एखादा झणझणीत आणि मसालेदार पदार्थ करून पाहू या… आजचा पदार्थ आहे अंडा बिर्याणी (Egg Biryani) … तोंडाला पाणी सुटलं ना… चला पाहू या सोप्या पद्धतीनं अंडा बिर्याणी कशी तयार करायची ते…

Egg Biryani

साहित्य

१) एक वाटी तांदूळ

२) तीन अंडी

३) एक चमचा मीठ

४) चार वेलचीच्या कुड्या

५) उभ्या आकाराचे कापलेले दोन कांदे

६) एक कापलेला टोमॅटो

७) दोन वाटी दही

Egg Biryani

कृती

१) गॅसवर एका पातेल्यात तांदूळ शिजवत ठेवा, त्यात चवीनुसार मीठ घाला आणि दुसऱ्या गॅसवर एका भांड्यात अंडी शिजवत ठेवा.

२) अंडी शिजल्यानंतर एक कढई गॅसवर ठेवून त्यात ती अंडी तेल, मीठ, तिखट मिक्स करून अंडी फ्राय करून घ्या.

३) त्यानंतर गॅसवर दुसरी कढई ठेवून त्यात तेल किंवा बटर घाला. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, बिर्याणी मसाला, मीठ आणि दही घाला. त्यानंतर पाण्याचा शिंपडा द्या.

४) नंतर त्यात शिजलेला भात आणि फ्राय केलेली अंडी घाला. त्यावर बारीक केलेली कोथिंबीर वरून टाका. गॅस बंद करून बिर्याणीवर झाकण ठेवा आणि १५ मिनिटं ठेवा. त्यानंतर तुमची अंडा बिर्याणी (Egg Biryani) तयार झाली.

पहा व्हिडीओ : खेकड्याची ही भन्नाट रेसीपी एकदा ट्राय कराच

या रेसिपी वाचल्यात का? 

Back to top button