शेतकऱ्यांसाठी ३ लाखांपर्यंत कर्ज; 'या' सोप्या पध्दतीने करा अर्ज | पुढारी

शेतकऱ्यांसाठी ३ लाखांपर्यंत कर्ज; 'या' सोप्या पध्दतीने करा अर्ज

पुढारी ऑनलाईन डेस्क

किसान क्रेडिट कार्ड या योजनेतून शेकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळू शकते. ही योजना केंद्र सरकारने १९९८ मध्ये सुरु केली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. याचे व्याज २ टक्क्यांपासून ते ४ टक्क्यांपर्यंत आहे. या कार्डद्वारे शेतकरी ३ लाखांपर्यंत कर्ज मिळवू शकतात. एसबीआयवरुन हे कर्ज घेण्यासाठी सोपी पध्दत आहे.

SBI किसान क्रेडिट कार्डसाठी, तुमचे खाते SBI मध्ये असले पाहिजे. तुम्ही बँकेच्या शाखेत KCC साठी अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनद्वारे YONO अॅप वापरून किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला फक्त YONO कृषी प्लॅटफॉर्मला भेट देऊन किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा आहे.

कर्ज घेण्यासाठी अशी करा प्रक्रिया

प्रथम तुम्ही SBI YONO अॅप डाउनलोड करा.
https://www.sbiyono.sbi/index.html वेबसाइटवर लॉग इन करू शकता, तुम्ही दोन्हीपैकी एक पर्याय घेऊ शकता.
YONO Agriculture च्या पर्यायावर जा.
त्यानंतर ‘खाते’ हा पर्याय निवडा.
येथे KCC पुनरावलोकन विभागात जा.
अर्जावर क्लिक करा आणि समोर उघडणाऱ्या विंडोमध्ये विनंती केलेली माहिती भरा आणि सबमिट करा. अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल. यावर तुम्हाला कर्ज मंजूर होऊ शकते.

हे आहेत SBI किसान क्रेडिट कार्डचे फायदे

KCC हे Revolving रोख क्रेडिट खात्यासारखे आहे.
३ लाखांपर्यंत झटपट कर्जदारांसाठी 3% व्याज सवलत.
पिकाच्या कालावधीनुसार आणि पिकांच्या विपणन कालावधीनुसार परतफेड.
सर्व पात्र KCC धारकांना रुपे कार्डचे वाटप.
रुपे कार्डधारकांसाठी १ लाख रुपयांचा अपघात विमा. यासाठी ४५ दिवसांतून एकदा कार्ड सक्रिय करावे.

कार्डवरुन तुम्हाला कमी वेळात कर्ज मिळू शकते.

हे ही वाचलत का?

अंबाबाई मंदिर दक्षिणायन किरणोत्सव सोहळा

 

Back to top button