Singhu Border : आंदोलनस्थळी शेतकऱ्यांचा मृतदेह आढळला | पुढारी

Singhu Border : आंदोलनस्थळी शेतकऱ्यांचा मृतदेह आढळला

नवी दिल्ली/सोनीपत : पुढारी वृत्तसेवा

तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सिंघू सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, एका शेतकऱ्यांच्या आज (दि.१०) सकाळी मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. गुरप्रीत सिंग (वय ४५) असे त्‍याचे  नाव असून तो अमरोह जिल्ह्यातील रुरकी तालुक्यातील फतेहगढ साहिब गावचा रहिवासी होता. (Singhu Border)

गुरुप्रीत सिंग यांचा मृतदेह कडुलिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत शेतकरी बीकेयू सिद्धपूर या संघटनेचे प्रमुख जगजित सिंग धलेवाल यांच्यासोबत काम करत होता.

Singhu Border : एकटाच ट्रॅक्टर ट्रॉलीसोबत राहत होता

तीन कृषी कायद्यांविरोधात निदर्शनात शेतकरी आपली वाहने घेऊन कुंडली सीमेवर आंदोलन करत आहेत. पंजाबमधील फतेहगढ साहिब जिल्ह्यातील रुरकी गावचा  गुरप्रीत सिंग तेथे राहात होता.  दिवाळी निमित्त त्‍याचे सहकारी गावी गेले होते. तो एकटाच ट्रॅक्टर ट्रॉलीसोबत राहत होता.

बुधवारी सकाळी हुडा सेक्टरमधील नांगल रोडवरील पार्कर मॉलजवळील कडुलिंबाच्या झाडाला एका व्यक्तीचा मृतदेह दोरीने लटकलेला दिसला. याची माहिती लोकांनी कुंडली पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मृताचे नाव समोर आल्याने ओळख पटली.

मृत शेतकरी भारतीय किसान युनियन सिद्धपूर या संघटनेशी संबंधित होता. जगजित सिंग ढाकेवाल यांच्या नेतृत्वाखाली तो सध्या या आंदोलनात सहभागी झाला होता. आजूबाजूच्या इतर ट्रॉलींवर राहणाऱ्या आंदोलकांकडूनही पोलिस माहिती घेत आहेत. आंदोलकांच्या माध्यमातून मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली असल्याचेही पाेलिस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलं का?

 

Back to top button