पुणे एसटी संप : भाडेदरावरून खासगी ट्रॅव्हल्स आणि प्रवाशांमध्ये वाद | पुढारी

पुणे एसटी संप : भाडेदरावरून खासगी ट्रॅव्हल्स आणि प्रवाशांमध्ये वाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा :

स्वारगेट स्थानकातून सोडण्यात येणाऱ्या खासगी गाड्यांच्या भाडे दरामुळे बुधवारी सकाळपासूनच प्रवासी आणि ट्रॅव्हल्स चालकांमध्ये वादाचे प्रकार घडल्‍याचे  समोर आले आहेत. (पुणे एसटी संप) ट्रॅव्हल्स चालक अतिरिक्त भाडे आकारत असल्याचा आरोप करत प्रवाशी नाराजी व्‍यक्‍त करत आहेत. (पुणे एसटी संप)

सरकारच्या आदेशाप्रमाणे स्वारगेट स्थानकातून बुधवारी सकाळपासूनच खासगी बसे मार्फत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, या सेवेबाबत प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे.

( पुणे एसटी संप ) वादावादीचे दाेन प्रसंग…

वेळ सकाळी साडेदहाची. एक ज्येष्ठ महिला स्वारगेट स्थानकातून उंब्रज येथे जाण्यासाठी आली होती. तिला खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या एजंटने पाचशे रुपये तिकीट दर सांगितले. मात्र एसटीचा तिकीट दर ३८० रुपये असल्यामुळे या ज्येष्ठ महिलेचे आणि ट्रॅव्हल्स चालकांमध्ये जोरदार वाद पेटला. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. तसेच ट्रॅव्हल्स चालकाला जादा भाडे आकारण्यास दम भरला.

दुसरी घटना अशी की, एका ज्येष्ठ नागरिकाला ट्रॅव्हल्स चालकांनी जादा भाडे आकारल्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटला. या घटनेची वेळ होती पावणे अकराची पोलिसांना मध्यस्ती करुन वाद मिटवावे लागले.

हेही वाचलं का?

Back to top button