समीर वानखेडे यांची आत्याही मैदानात; ॲट्रॉसिटीची तक्रार | पुढारी

समीर वानखेडे यांची आत्याही मैदानात; ॲट्रॉसिटीची तक्रार

मुंबई, पुढारी ऑनलाईन

एनसीबीचे झोनल ऑफिसर समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ पत्नी क्रांती रेडकर उतरल्यानंतर आता त्यांची आत्याही त्यांची बाजू घेत आहेत. समीर यांची आत्या गुंफाबई भालेराव यांनी औरंगाबादमधील मुकुंदनगर, मुकुंदवाडी येथे ॲट्रॉसिटीची तक्रार दिली आहे. समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या सततच्या आरोपांमुळे आमच्या कुटुंबीयांची मानसिक स्थिती बिघडली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. समीर हे माझे भाचे असून एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत.

समीर वानखेडे ॲट्रॉसिटीची तक्रार : जावयावरील कारवाईने मलिकांचा अपप्रचार

अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना वानखेडे यांनी अटक केली होती. या कारवाईमुळे समीर वानखेडे व कुटुंबाविरोधात आरोप करत आहेत. आर्यन खान याच्या प्रकरणानंतर मलिक यांनी समीर यांच्या जातीबद्दल पत्रकार परिषदेत काही दावे केले. हा प्रचार खोटा असून आमच्या कुटुंबाची मानसिकता बिघडली आहे. त्यामुळे सर्व कुटुंबीय तणावात आहेत.

त्यामुळे मलिक यांच्याविरोधात कलम ४, (२), (ब) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गुंफाबाई भालेराव यांनी केली आहे. तक्रार अर्जासोबत त्यांनी वंशावळ आणि जात प्रमाणपत्रही सादर केले आहे.

मेहुणीचीही एंट्री

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील लढाई अधिक टोकदार होत असताना आता वानखेडे यांच्या मेहुणीचीही या वादात एंट्री झाली आहे. मलिक यांनी टि्‌वट करून वानखेडे यांची मेहुणी ड्रग्ज प्रकरणात असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली. यावर वानखेडे यांनी ‘खूप छान, एका महिलेचे नाव सार्वजनिक केल्याबद्दल धन्यवाद’ अशी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

मलिक यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना वानखेडे यांनी हे प्रकरण २००८ मधील आहे. माझे आणि क्रांती रेडकर यांचे लग्न २०१७ मध्ये झाले. क्रांतीच्या बहिणीवर गुन्हा दाखल झाला तेव्हा मी नोकरीतही नव्हतो. क्रांतीची बहीण हर्षदा हिच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा मी नोकरीत नव्हतो. मग माझा या केसशी काय संबंध? असा सवाल केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button