सातारा सेल्फी पॉईंट व्हावा : वेदांतिकाराजे, 'राजधानी सातारा' सेल्फी पॉईंटचे लोकार्पण | पुढारी

सातारा सेल्फी पॉईंट व्हावा : वेदांतिकाराजे, 'राजधानी सातारा' सेल्फी पॉईंटचे लोकार्पण

सातारा : पुढारी वृत्तसेवा

स्वतःचा सेल्फी फोटो मोबाईलमधून घेणे प्रत्येकाला आवडते. सातारकरांसाठी राजधानी सातारा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. सातारा हा सुंदर सेल्फी पॉईंट व्हावा, असे गौरवोद्गार कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी काढले.

पोवईनाक्यावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वखर्चातून राजधानी सातारा’ हा सेल्फी पॉईंट उभारला आहे. याचे लोकार्पण वेदांतिकाराजे भोसले आणि युवराज रुद्रनीलराजे भोसले यांच्या हस्ते काल (दि.०९) मंगळवारी सायंकाळी करण्यात आले.

यावेळी वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या, सातारा शहराच्या सुशोभिकरणासाठी आ. शिवेंद्रराजे यांच्यासोबत चर्चा केली. ‘आय लव्ह सातारा’ या नावाने करण्यात येणार होता. तसे जाहीरही केले होते.

मात्र ‘आय लव्ह सातारा’ पेक्षा सेल्फी पॉईंट करा, अशी बऱ्याच लोकांची मागणी आली. त्यानुसार ‘राजधानी सेल्फी पॉईंट करण्यात आला. कोरोनामुळे या पॉईंटचे उद्घाटन करता आले नव्हते. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती मोबाईलमधून सेल्फी घेत असतात. ‘राजधानी सातारा’ हा पॉईंट सर्वांसाठी खुला झाला असून त्याचे लोकार्पण झाले असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Back to top button