Stock Market Closing Bell | बाजारात तेजीचा माहौल! सेन्सेक्स पुन्हा उसळला, गुंतवणूकदार ३ लाख कोटींनी मालामाल

Stock Market Closing Bell | बाजारात तेजीचा माहौल! सेन्सेक्स पुन्हा उसळला, गुंतवणूकदार ३ लाख कोटींनी मालामाल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : कालच्या घसरणीतून सावरत आज शुक्रवारी सेन्सेक्सने तेजीत व्यवहार केला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स सुमारे ६०० अंकांनी वाढून ६६,१०० वर गेला. तर निफ्टी १९,७०० वर राहिला. त्यानंतर सेन्सेक्स ३२० अंकांच्या वाढीसह ६५,८२८ वर स्थिरावला. तर निफ्टी ११४ अंकांनी वाढून १९,६३८ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell)

जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजाराने कालचे नुकसान भरून काढले. काल जवळपास १ टक्क्यांच्या घसरणीनंतर शुक्रवारी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांनी वाढून व्यवहार केला. आज बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. आजच्या तेजीमुळे सर्व बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३.२८ लाख कोटींनी वाढून ३१९.९४ लाख कोटींवर गेले.

संबंधित बातम्या 

हेवीवेट शेअर्स तेजीत

आजच्या तेजीत रिलायन्स, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय हेवीवेट शेअर्सचा समावेश होता. सेन्सेक्स आज ६५,७४३ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६,१५१ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर एनटीपीचा शेअर टॉप गेनर होता. हा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वाढून २४५ रुपयांवर पोहोचला. टाटा मोटर्सचा शेअर २.६० टक्के वाढून ६२९ रुपयांवर गेला, सन फार्मा, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, अल्ट्राटेक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. ॲक्सिस बँक, रिलायन्स, बजाज फायनान्स, आयटीसी, रिलायन्स या शेअर्सनीही हिरव्या चिन्हात व्यवहार केला.

निफ्टी ५० आज १९,५८१ वर खुला झाला होता. त्यानंतर तो १९,७२६ पर्यंत वाढला. निफ्टीवर हिंदाल्को, एनटीपीसी, हिरो मोटोकॉर्प हे टॉप गेनर्स राहिले. हे ३ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर अदानी एंटरप्रायजेस, LTIMindtree हे टॉप लूजर्स ठरले.

एनएसई (NSE) वर आज सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी नफा नोंदवला. यावर निफ्टी फार्मा हा सुमारे ३ टक्के वाढीसह आघाडीवर राहिला. तर निफ्टी मेटल निर्देशांक सुमारे २ टक्के वाढला.

MCX चे शेअर्स घसरले

वैयक्तिक स्टॉक्समध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) चे शेअर्स ८ टक्क्यांनी घसरले. पुढील आठवड्यासाठी नियोजित त्याच्या नवीन कमोडिटी डेरिव्हेटिव्ह प्लॅटफॉर्मचे प्रस्तावित गो-लाइव्ह होल्ड करण्यास सेबीने कंपनीला सांगितल्यानंतर MCX चे शेअर्स घसरले.

जागतिक बाजार

आशियाई बाजारांत टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग येथील निर्देशाकांनी सकारात्मक व्यवहार केला. जपानचा निक्केई ०.१० टक्क्यांनी खाली आला. तर हाँगकाँगचा हँगसेंग ०.६४ टक्क्यांनी वाढला. चीनमधील बाजार आज सुट्टीमुळे बंद होता. अमेरिकेच्या बाजारातील निर्देशांकही काल हिरव्या चिन्हात बंद झाले होते. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) ०.३५ टक्क्यांनी, एस अँड पी ५०० निर्देशांक (S&P 500) ०.५ टक्क्यांनी आणि नॅस्डॅक (Nasdaq) ०.८ टक्क्यांनी वाढला.

परदेशी गुंतवणूकदार

एक्सचेंज आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी (Foreign investors) ३,३६४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी गुरुवारी २,७११ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. (Stock Market Closing Bell)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news