तेजीला तात्पुरता ब्रेक निफ्टी | पुढारी

तेजीला तात्पुरता ब्रेक निफ्टी

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

निफ्टीचा प्रवास 25000 कडे आणि सेन्सेक्सचा 1,00,000 कडे सुरू झाला. असे वाटत असतानाच, गेल्या सप्ताहात हे दोन्ही निर्देशांक जवळपास अडीच टक्क्यांनी घसरले आणि अनुक्रमे 19674.25 आणि 66009.15 वर बंद झाले. बँक निफ्टीही सव्वा तीन टक्क्यांनी घसरून 44612.05 वर बंद झाला. निफ्टीने 2000 च्या वर आणि बँक निफ्टीने 45000 च्या वर टिकून राहणे आवश्यक आहे.

नुकताच उफाळून आलेला भारत कॅनडा वाद, अमेरिकेतील वाढते बाँड यील्डेस आणि त्यामुळे व्याजदर वाढण्याची भीती, सौदी अरेबिया आणि रशियाने तेल उत्पादन कमी केल्यामुळे, क्रूड ऑईलचे वाढलेले दर 83 रूपयांच्या पलीकडे गेलेला डॉलरचा भाव, परदेशी वित्तसंस्थांची सततची विक्री आणि इंडियन मार्केटचे वाढलेले व्हॅल्यूएशन! इतक्या सगळ्या घटकांनी वातावरण भारलेले असताना, अडीच टक्क्यांचे करेक्शन ही फार काही चिंतेची बाब नाही.

भारत कॅनडा वाद हा प्रामुख्याने राजकीय आहे. त्याचा भारतीय मार्केटवर फार परिणाम होणार नाही. महिंद्रा आणि महिंद्रा या ऑटो कंपनीचा व्यवसाय कॅनडामध्ये आहे. बाकी विप्रो टीसीएस आणि इन्फोसीस या तीन आयटी कंपन्यांचा व्यवसाय कॅनडामधून येतो. त्यापैकी विप्रो आणि इन्फोसिस हे दोन्ही शेअर्स किरकोळ प्रमाणात खाली गेले. महिंद्रा आणि महिंद्रा सप्ताहात तेजीतच होता. आणि टीसीएस 52 थशशज्ञ कळसह च्या पातळीवर आहे.

विप्रोचा शेअर आठवड्यात साडेपाच टक्क्यांनी घसरला आणि 418.50 वर बंद झाला. कंपनीचे उऋज जतीन दलाल यांनी कंपनीचा राजीनामा दिल्यामुळे तो घसरला. त्यांची जागा अपर्णा अय्यर या घेतील. एचडीएफसी बँकेचा शेअर पावणे सात टक्क्यांनी घसरला. (रु. 1530.20) एचडीएफसीबरोबर विलीनीकरण झाल्यामुळे बँकेच्या छशीं खपींशीशीीं ारीसळप व विपरीत परिणाम होईल, असा कयास व्यक्त करून बर्‍याच ब्रोकरेज फर्मसनी बँकेचे लक्ष कमी केले. त्यामुळे हा शेअर घसरला.

विश्लेषकांच्या मते, ही परिस्थिती अगदी थोड्या अवधीसाठी असेल. एचडीएफसी एएमसीला रिझर्व्ह बँकेकडून पाच बँकांच्या शेअर्समध्ये साडेनऊ टक्क्यांपर्यंत होल्डिंग वाढवण्यासाठी अनुमती मिळाली. त्या पाच बँका खालीलप्रमाणे…

1) डीसीबी,
2) इक्विटास स्मॉल फायनान्स बँक,
3) दि फेडरल बँक,
4) करूर वैश्य बँक,
5) सिटी युनियन बँक.

निफ्टी-पीएसयू बँक या इंडेक्सविषयी मागच्याच आठवड्यात लिहिले होते. या आठवड्यातही हा इंडेक्स 3.85% नी वाढला. जेपी मॉर्गनचा र्ॠेींशीपाशपीं इेपव खपवशु – एाशीसळपस ारीज्ञशीीं हा इंडेक्स जगभर डेट गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक ठरणारा फंड आहे आणि त्यामध्ये इंडियन गव्हर्न्मेंट बाँडस्चा 10 टक्के समावेश करण्याचा निर्णय जेपी मॉर्गनने घेतला आहे. भारताच्या गुंतवणूक क्षेत्रासाठी अत्यंत लाभदायी ठरणारी ही घटना आहे. निफ्टी पीएसयू बँक, इंडेक्समधील सर्वच्या सर्व 12 सरकारी बँकांचे शेअर्स एकतर 52 थशशज्ञ कळसह च्या पातळीवर आहेत.

येणार्‍या काही कालावधीसाठी खालील शेअर्सना बर्‍याच ब्रोकरेज फर्मसनी वरचे टार्गेटस् दिले आहेत.

1) बँक ऑफ इंडिया,
2) अशोक लेलँड,
3) टाटा मोटर्स,
4) हिरो मोटो.

वरीलपैकी बँक ऑफ इंडिया (रु. 109.05) चा शेअर हा केवळ 9.74 च्या पीईवर ट्रेड करतो आहे. मागील एका वर्षात या शेअरने 118 टक्के असे नेत्रदीपक रिटनर्स दिले आहेत.

Back to top button