Venus Orbiter Mission | इस्रोची आता शुक्र मोहीम; एस सोमनाथ यांची घोषणा

Venus Orbiter Mission | इस्रोची आता शुक्र मोहीम; एस सोमनाथ यांची घोषणा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चंद्र, मंगळ आणि सूर्य या ग्रहांचा अभ्यास करण्याच्या यशस्वी मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आता शुक्र ग्रहाची रहस्ये जाणून घेण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ (S. Somanath) यांनी मंगळवारी (दि.२६) याबाबत घोषणा केली. दिल्लीतील इंडियन नॅशनल सायन्स अकादमीला संबोधित करताना सोमनाथ यांनी शुक्र मोहिमेची (Venus Orbiter Mission) घोषणा केली.

संबंधित बातम्या : 

इस्रोचे (ISRO) अध्यक्ष एस सोमनाथ (S. Somanath) यांनी मंगळवारी (दि.२६) जाहीर केले की, "सौरमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्रावर मोहीम पाठवण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी पेलोड आधीच विकसित केले गेले आहेत. अंतराळातील अज्ञात रहस्ये शोधण्यासाठी भारत आता अंतराळ शर्यतीत वेगाने पुढे जात आहे. शुक्राचा अभ्यास (Venus Orbiter Mission) केल्याने अवकाश विज्ञान क्षेत्रातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. शुक्र (Venus) हा एक अतिशय मनोरंजक ग्रह आहे. पृथ्वीप्रमाणेच शुक्रावरही वातावरण आहे. वातावरणाचा दाब हा पृथ्वीच्या १०० पट आहे," असे ते म्हणाले.

पृथ्वीवरील जीवसृष्टीसमोरही भविष्यातील कठीण आव्हानांची भीती व्यक्त करून ते म्हणाले, "आम्ही शुक्र ग्रहाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण पृथ्वीवरील परिस्थितीही एक दिवस शुक्रासारखी होऊ शकते. दहा हजार वर्षांनंतर आपल्या ग्रहाची वैशिष्ट्ये बदलतील. पृथ्वी आजच्यासारखी कधीच नव्हती. फार पूर्वी ती राहण्यायोग्य नव्हती. पण हळुहळू परिस्थिती बदलली आणि आज इथे जीवसृष्टी आहे."

याआधी 'या' देशांनी शुक्रावर मोहिमा पाठवल्या? (Venus Orbiter Mission)

शुक्र ग्रहाशी संबंधित मोहिमांमध्ये, अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) च्या पार्कर सोलर प्रोबनेही शुक्राच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी, नासाने माहिती दिली की पार्कर सोलर प्रोबने फेब्रुवारी २०२१ मध्ये अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा घेतली होती. नासाच्या भविष्यातील शुक्र मोहिमा २०२९, २०३० आणि २०३१ मध्ये होण्याची शक्यता आहे. याशिवाय युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या व्हीनस एक्स्प्रेस (जी २००६ ते २०१६ पर्यंत परिभ्रमण करत होती) आणि जपानचे अकात्सुकी व्हीनस क्लायमेट ऑर्बिटर (जे २०१६ पासून परिभ्रमण करत होते) यांचा समावेश आहे.


हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news