पुढारी ऑनलाईन डेस्क: राजधानी दिल्लीत दोन दिवसीय G20 शिखर परिषद पार पडत आहे. आज (दि.१० सप्टेंबर) परिषदेची सांगता झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या परिषदेनिमित्त झालेली भेट हे या परिषदेचे खास आकर्षण राहले. या भेटीमध्ये भारत-अमेरिका यांच्यात अंतराळ क्षेत्रातील भागीदारीवर महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही देश २०२४ मध्ये अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्याची योजना आखत असल्याचे वृत्त 'पीटीआय' ने दिली आहे. (India-US Space Partnership)
पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश आगामी २०२४ वर्षात भारतीय अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्याची योजना आखत आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस मानवी अंतराळ उड्डाणासाठी एक धोरणात्मक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी G20 मध्ये चर्चा सुरू करण्यात आल्याचेही 'पीटीआय'ने म्हटले आहे. (India-US Space Partnership)
दिल्लीतील G20 परिषदेत सुमारे २८ देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी उपस्थिती हाेते. या परिषदेच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात G20 खास चर्चा झाली. पुढील वर्षी २०२४ मध्ये भारत आणि अमेरिका अंतराळ संशोधनात एकत्र काम करणार असल्याचे संकेत मिळत असल्याचे 'पीटीआय'ने म्हटले आहे. (India-US Space Partnership)
भारताची अंतराळ संशोधन संस्था-इस्रो (ISRO) आणि अमेरिकेची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन संस्था-नासाने (NASA) २०२४ मध्ये 'आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर' संयुक्त प्रयत्न करण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. भारत आणि अमेरिकेत होणाऱ्या 'मानवी अंतराळ' प्रक्षेपण मोहिमेच्या सहकार्यासाठी धोरणात्मक फ्रेमवर्कला २०२३ च्या अखेरीस अंतिम रूप देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमी नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात ५२ मिनिटे चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नुकतेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात चांद्रयान-३ मोहिमेच्या विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग आणि संशोधन केले. आदित्य- L1 या सूर्यमोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. G20 परिषदेसाठी भारतात आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या भेटीदरम्यान मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदनही केले आहे.