ISRO’s Bikini Mission : ISRO प्रक्षेपित करणार युरोपियन कंपनीचे ‘Bikini’ यान ; जाणून घ्या काय आहे हे मिशन…

ISRO Bikini Mission
ISRO Bikini Mission

पुढील ऑनलाइन डेस्क : ISRO's Bikini Mission : चांद्रयान 3 आणि आदित्य L1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर जगभरातील नावाजलेल्या अंतराळ संशोधन संस्थांचे लक्ष ISRO ने आपल्याकडे खेचले आहे. चांद्रयान आणि आदित्य मोहिमेनंतर आता ISRO पुढे अनेक महत्वाच्या मोहिमा आहेत. याशिवाय इस्रो अन्य अंतराळ संस्थांनी विकसित केलेले यान देखील प्रक्षेपित करणार आहे. यापैकीच एक महत्वाचे मिशन आहे मिशन Bikini! आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. जाणून घेऊ या या प्रक्षेपणाबद्दल सर्व काही…

ISRO's Bikini Mission : काय आहे Bikini?

Bikini एक युरोपियन अंतराळ यान आहे. जे पुढील वर्षी 2024 मध्ये इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटने (PSLV Rocket) अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हे यान अतिशय बारीक आणि पातळ आहे. हे यान युरोपियन स्टार्टअप द एक्सप्लोरेशन कंपनी (The Exploration Company) चे एक री-एन्ट्री व्हेइकल आहे. बिकिनी (Bikini) हे कंपनीच्या री यूजेबल री-एन्ट्री मॉड्यूलर निक्स (Nyx) चे छोटे वर्जन आहे.
या मिशन अंतर्गत बिकिनीला सुमारे 500 किलोमीटर अंतरावर रॉकेटद्वारे PS4 सह सोडण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. PS4 नंतर बिकिनी डिबूस्ट करून कक्षा सोडेल. त्यानंतर ते 120 किंवा 140 किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर, तो बिकिनीला अंतराळात सोडेल. तेथून बिकिनी थेट समुद्रात पडेल.

ISRO's Bikini Mission : काय आहे Bikini चा उद्देश

इस्रोचे पीएसएलव्ही रॉकेट बिकिनीला घेऊन पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 किलोमीटर वर पर्यंत नेऊन सोडणार आहे. जेथून हे यान पुन्हा पृथ्वीवर परतेल. यादरम्यान, त्याच्या पुन्हा प्रवेशाबाबत अनेक तपासण्या केल्या जातील. ते वातावरण ओलांडून समुद्रात पडेल. बिकिनीचे वजन फक्त 40 किलो आहे. त्याचा उद्देश अंतराळात वितरण (डिलिवरी) करणे हा आहे. जर बिकिनी जानेवारीच्या री-एंट्री मिशनमध्ये यशस्वी झाली, तर ते व्यावसायिक उड्डाणांच्या नवीन जगाचे दरवाजे उघडेल. म्हणजे अंतराळात कोणताही माल पोहोचवता येईल तोही स्वस्तात.

Bikini Spacecraft
Bikini Spacecraft

ISRO's Bikini Mission : प्रक्षेपण 'एरियनस्पेस' ऐवजी न्यू स्पेस इंडिया लिमिटेडकडे

बिकिनीला अंतराळात प्रक्षेपित करण्याचे हे मिशन पूर्वी युरोपियन एरियनस्पेस कंपनीला देण्यात आले होते. मात्र, नंतर भारताच्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ने हे मिळवले. एरियनस्पेसचे एरियन 6 हे रॉकेट विकसित करण्यासाठी वेळ लागणार होता. परिणामी एरियन स्पेस ऐवजी भारताच्या NSIL ला हे मिशन मिळाले. बिकिनीला पीएसएलव्ही रॉकेटच्या चौथ्या स्टेजमध्ये लावले जाणार आहे. नंतर ते अंतराळात सोडले जाईल. अंतराळात सोडल्यानंतर तिथून बिकीनी पुन्हा परतीचा प्रवास करेल. इस्रोने या पूर्वीही अनेक देशांचे अंतराळ यान प्रक्षेपित केले आहे. तसेच या व्यवसायात इस्रोने आपले पाय मजबुतीने रोवले आहेत.

ISRO's Bikini Mission : मोहिमेत POEM चा वापर केला जाईल

या मोहिमेदरम्यान एक्सप्लोरेशन कंपनीला प्राप्त होणारा डेटा त्यांना भविष्यात चांगले री-एंट्री आणि रिकव्हरी तंत्रज्ञान विकसित करण्यात मदत करेल. PS4, PSLV रॉकेटमधील चौथा टप्पा, अलीकडे PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल (POEM) साठी वापरला गेला.

ISRO's Bikini Mission : बिकिनीला योग्य उंचीवर नेऊन सोडेल

POEM म्हणजेच PS4 आता पृथ्वीभोवती फिरताना प्रयोग करते. बिकिनी PS4 वर पोर्ट केले जाईल. जेणेकरून मुख्य मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण बिकिनीमध्ये प्रोपल्शन सिस्टीम बसवण्यात आलेली नाही. तो फक्त PS4 च्या मदतीने अवकाशात काही वेळ घालवेल. योग्य उंची गाठल्यावर PS4 डिबुस्ट करून बिकिनीला सोडेल. त्यानंतर बिकीनी यान त्वरीत वातावरण ओलांडून समुद्रात पडेल.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news