अभिमानास्पद! iPhone 15 Pro ला ‘ISRO’ चे ‘दिशादर्शन’ | पुढारी

अभिमानास्पद! iPhone 15 Pro ला 'ISRO' चे 'दिशादर्शन'

पुढारी ऑनलाईन डेस्क:  ॲपल कंपनीने नुकतीच iPhone 15 Pro सीरीज लॉन्च केली आहे. या नवीन सीरिजमध्ये त्याची कार्यक्षमता आणि कॅमेरा क्षमतेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत; परंतु कंपनीने त्याच्या कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांमध्येही मोठा बदल केला आहे. ॲपलने iPhone 15 Pro सिरीज या सीरिजमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) NavIC Tech हे नवीन दिशादर्शक तंत्रज्ञान वापरले आहे. ISROच्या तंत्रज्ञानाचा वापर अमेरिकेतील सर्वोच्च कंपनीने करणे ही भारतासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. (ISRO NavIC Technology)

NavIC ISRO द्वारे विकसित केले गेले आहे. इस्रोचे हे नवीन नेव्हिगेशन तंत्रज्ञान सर्वप्रथम Qualcomm या अमेरिकन कंपनीसोबत करार करत मोबाइल चिपसेटमध्ये वापरण्यात आले आहे; पण आता भारतातील स्पेस एजन्सीने Apple कंपनीसोबत नवीन करार करत ॲपलच्या A17 Pro चिपसेटमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. NavIC हे इस्रोचे नवीन तंत्रज्ञान iPhone 15 Pro आणि 15 Pro Max या सीरिजममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ही भारतासाठी मोठी गोष्ट असल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. (ISRO NavIC Technology)

‘या’ आहेत जागतिक स्तरावरील जलमार्ग GPS प्रणाली

जागतिक स्तरावर आणखी तीन जलमार्ग दिशादर्शक (GPS) प्रणाली कार्यरत आहेत. ज्यामध्ये युरोपियन युनियनची ‘Galileo’, रशियाचे ‘GLONASS’ आणि चीनचे ‘Beidou’ तर जपानची ‘QZSS’ याचा समावेश आहे. यामध्ये आता ISRO च्या NavIC या नवीन जलमार्ग दिशादर्शक (GPS) प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे.

भारताचे सॅटेलाइट नेव्हिगेशन धोरण

भारताच्या 2021 सॅटेलाइट नेव्हिगेशन मसुदा धोरणात असे म्हटले आहे की, जगाच्या कोणत्याही भागात NavIC सिग्नलची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार “प्रादेशिक ते जागतिक कव्हरेज विस्तारित करण्यासाठी” काम करेल.

ISRO NavIC Technology: काय आहे ISRO चे NavIC तंत्रज्ञान?

NavIC, किंवा Navigation with Indian Constellation, ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे विकसित केलेली स्वतंत्र स्वतंत्र नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली आहे. NavIC ला मूळत: 2006 मध्ये $174 दशलक्ष खर्चून मान्यता देण्यात आली होती. 2011 च्या अखेरीस ते पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु 2018 मध्येच ते कार्यान्वित झाले. NavIC मध्ये आठ उपग्रहांचा समावेश आहे आणि संपूर्ण भारताचा भूभाग आणि त्याच्या सीमेपासून 1,500 किमी (930 मैल) पर्यंत व्यापलेला आहे.

ISRO च्या NavIC तंत्रज्ञानाचा वापर

सध्या, NavIC चा वापर मर्यादित आहे. याचा उपयोग भारतात सार्वजनिक वाहनांच्या मागोवा घेण्यासाठी, खोल समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांना आपत्कालीन चेतावणी इशारे प्रदान करण्यासाठी आणि स्थलीय नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसलेल्या, ट्रॅकिंग आणि नैसर्गिक आपत्तींशी संबंधित माहिती प्रदान करण्यासाठी केला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button