Dr Manmohan Singh Birthday : डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | पुढारी

Dr Manmohan Singh Birthday : डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या अर्थव्यवस्थेला ऐतिहासिक कलाटणी देत देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग (Dr Manmohan Singh Birthday) यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (dr manmohan singh birthday wishes)

संबंधित बातम्या : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (former PM Manmohan Singh) यांच्याशी फोनवर बोलून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी  एक्सवरूनही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्सवर लिहिले की, “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.”

डॉ. मनमोहन सिंग (Dr Manmohan Singh Birthday) यांचा आज, २६ सप्टेंबर, ९१ वा वाढदिवस आहे. २६ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेले डॉ. सिंग हे जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी आहेत. त्यांनी केंद्रात काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करताना २००४ ते २०१४ या काळात दहा वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. एक राजकारणी असण्यासोबतच, सिंग हे एक अर्थशास्त्रज्ञ देखील आहेत. त्यांनी १९८२-८५ पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे गव्हर्नर म्हणून काम केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button