बराक ओबामांच्या आत्मचरित्रात मनमोहन सिंग आणि राहुल गांधींचा समावेश! पाहा काय म्हणाले… | पुढारी

बराक ओबामांच्या आत्मचरित्रात मनमोहन सिंग आणि राहुल गांधींचा समावेश! पाहा काय म्हणाले...

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे राजकीय संस्मरण असलेले पुस्तक प्रकाशित झाले आहे. प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे नाव ‘अ प्रॉमिस लँड’ आहे. यामध्ये अमेरिकेतील राजकीय दिग्गजांसह इतर देशांमधील अनेक नेत्यांचा उल्लेख आहे. ज्यामध्ये भारतातील राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा समावेश आहे. ओबामा यांच्या कार्यकाळात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात यूपीए सरकार सत्तेत होते. 

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात राहुल गांधींबद्दल बरेच काही सांगितले आहे. ओबामा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींचा उल्लेख त्यांच्या ‘अ प्रॉमिसड लँड’ या आत्मचरित्रात केला आहे. ओबामा यांनी आत्मचरित्रात राहुल गांधींना चिंताग्रस्त आणि कमी व्यवहार्य असल्याचे म्हटले आहे. पुस्तकात ओबामा यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही उल्लेख केला आहे.

बराक ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, ‘राहुल गांधी असा विद्यार्थी आहे ज्याने अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि तो शिक्षकांना प्रभावित करण्यास उत्सुक आहे. परंतु ते करण्यासाठी एकतर त्यातील योग्यता नाही किंवा या विषयावर प्रभुत्व मिळविण्याची उत्कटता नाही. त्यांनी राहुल गांधींचे वर्णन ‘चिंताग्रस्त आणि नि:स्वार्थी’ असे केले आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने ओबामांच्या आत्मचरित्राची समीक्षा केली आहे. यामध्ये माजी राष्ट्राध्यक्षांनी जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका समीक्षेमध्ये ओबामा राहुल गांधींबद्दल म्हणतात की,  ते असे विद्यार्थी आहेत ज्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे, पण त्यामध्ये क्षमता किंवा प्राविण्य मिळविण्याची उत्कटता नाही.

आठवणींमध्ये ओबामांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही उल्लेख केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, ‘आम्हाला चार्ली क्रिस्ट आणि रहम इमॅन्युएलसारख्या पुरुषांच्या हँडसमबद्दल सांगितले गेले आहे. परंतु, महिलांच्या सौंदर्याबद्दल नाही. फक्त एक-दोन उदाहरणे म्हणजे सोनिया गांधींसारखे अपवाद.

अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री बॉब गेट्स आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांमध्ये प्रामाणिकपणा असल्याचे म्हटले आहे. त्यात असेही म्हटले आहे की रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन शिकागो मशीन चालवणारे बलाढ्य व हुशार बॉसची आठवण करून देते. पुतिन यांच्याबद्दल ओबामा लिहितात, शारीरिकदृष्ट्या ते सामान्य आहेत. ओबामा यांचे हे ७६८ पानांचे आत्मचरित्र १७ नोव्हेंबरला बाजारात दाखल होणार आहे. अमेरिकेचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन अध्यक्ष ओबामा दोनवेळा भारत दौऱ्यावर आले होते. 

Back to top button