TIOL Award : ‘आर्थिक सुधारणांसाठी देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी’ – नितीन गडकरी | पुढारी

TIOL Award : 'आर्थिक सुधारणांसाठी देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी' - नितीन गडकरी

पुढारी ऑनलाइन डेस्क : TIOL Award : आर्थिक सुधारणांसाठी देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले. यावेळी गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी 90 च्या दशकात केलेल्या आर्थिक सुधारणांबाबत मनमोहन सिंग यांच्याबद्दल अनेक गौरवोद्गार काढले. गडकरी हे TIOL पुरस्कार 2022 या कार्यक्रमात बोलत होते.

TIOL Award : TIOL (TaxIndiaOnline) या पोर्टलने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 90 च्या दशकात केलेल्या आर्थिक सुधारणांबाबत त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. गडकरी म्हणाले आर्थिक सुधारणांसाठी देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे. भारताला उदारमतवादी आर्थिक धोरणाची गरज आहे, ज्याचे फायदे गरीब लोकांना मिळावेत.

सिंग यांनी 1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांनी भारताला एक नवी दिशा दिली कारण त्यातून उदारमतवादी अर्थव्यवस्थेचा उदय झाला आणि नवी दिशा देणा-या उदारीकरणासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे.

TIOL Award : माजी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे 1990 च्या दशकाच्या मध्यात महाराष्ट्रात मंत्री असताना ते महाराष्ट्रात रस्ते बांधण्यासाठी पैसे उभे करू शकले होते याची आठवण त्यांनी सांगितली.

उदारमतवादी आर्थिक धोरण शेतकरी आणि गरीब लोकांसाठी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. उदारमतवादी आर्थिक धोरण कोणत्याही देशाच्या विकासात कशी मदत करू शकते याचे चीन हे उत्तम उदाहरण असल्याचेही ते म्हणाले.

TIOL Award : आर्थिक विकासाला गती देण्यासाठी भारताला अधिक कॅपेक्स गुंतवणुकीची गरज असल्याचे ते म्हणाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की, एनएचएआय महामार्गांच्या बांधकामासाठी सामान्य माणसांकडून पैसे देखील उभारत आहे.

हे ही वाचा :

गुजरात विधानसभा निवडणूक २०२२ : गुजरातमध्ये ‘हे’ दिग्गज नेते करणार आम आदमी पार्टीचा प्रचार; २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

देशातील 10 लाख रेशन कार्डे रद्द होणार; जाणून घ्या अपात्र कार्डधारकांत कोण?

Back to top button