Bengaluru Bandh : कावेरी पाणीप्रश्नी उद्या बंगळूर बंद; कन्नड संघटनांची हाक | पुढारी

Bengaluru Bandh : कावेरी पाणीप्रश्नी उद्या बंगळूर बंद; कन्नड संघटनांची हाक

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : कावेरी पाणी वाटपावरून (cauvery water dispute) राज्यातील शेतकरी आणि कन्नड संघटना आक्रमक झाल्या आहेत. मंगळवारी (दि. २६) बंगळूर बंदची (Bengaluru Bandh) हाक देण्यात आली आहे. तर शुक्रवारी (दि. २९) कर्नाटक बंद करण्याची घोषणा कन्नड संघटनांनी केली आहे. तथापि कर्नाटक बंद (karnataka Bandh) बाबत सोमवारी (दि. २५) चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या : 

कावेरी नदीतून तामिळनाडूला रोज ५ हजार क्यूसेक पाणी सोडण्याचा आदेश कावेरी पाणी वाटप प्राधिकारने दिला आहे. यामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. शनिवारी (दि. २४) रोजी मंड्या जिल्हा बंद (bangalore Bandh) ठेवण्यात आला होता. आता बंदचे लोण राज्यभरात पसरत चालले असून, २६ रोजी बंगळूर बंदची हाक देण्यात आली आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना तामिळनाडूला पाणी सोडण्याचे दिलेले आदेश अन्यायकारक आहेत, असा आरोप काही कन्नड संघटनांनी केला आहे. (why bangalore bandh on tuesday) त्यांनी बंगळूर येथील म्हैसूर बँक चौकात आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी बंगळूर बंदनंतर कर्नाटक बंद करण्यात येणार आहे. कर्नाटक बंद दि. २९ रोजी करण्यात येणार असून, याबाबत कन्नड संघटनांबरोबर चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती कन्नड संघटनांचे नेते वाटाळ नागराज यांनी दिली आहे.

अधिवेशन बोलावण्याची मागणी

कन्नड संघटनांनी तामिळनाडूला कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडू नये. राज्यातील खासदारांनी पदाचा राजीनामा द्यावा. कावेरी पाणी वाटप निर्णयाविरोधात विधीमंडळाचे तातडीने अधिवेशन बोलवावे, अशी मागणी कन्नड संघटनांनी केली आहे.

बंद मागे घेण्याची मागणी (bangalore bandh tomorrow)

दरम्यान, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी बंगळूर बंदचा निर्णय मागे घेण्यात यावा. आंदोलनाने समस्या सुटणार नाही. बंदला आमचा विरोध नाही. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला घटनेने हक्क दिला आहे. आम्ही राज्याच्या हितासाठी आग्रही आहोत. मात्र बंदमुळे सामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल. यामुळे बंद मागे घ्यावा, अशी सूचना केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button