‘लिव्ह-इन पार्टनर’ तरुणीची डोक्‍यात कूकर घालून हत्‍या, बंगळूरुमधील धक्‍कादायक प्रकार

‘लिव्ह-इन पार्टनर’ तरुणीची डोक्‍यात कूकर घालून हत्‍या, बंगळूरुमधील धक्‍कादायक प्रकार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बंगळूरुमध्‍ये एका २४वर्षीय तरुणाने आपल्‍या लिव्ह-इन पार्टनरचा (live-in partner)  प्रेशर कुकरने खून केल्याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी वैष्णव याला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी सी के बाबा यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले की, "वैष्णव आणि देवा हे दोघेही मूळचे केरळचे आहेत. दोघेही बंगळूरुमध्‍ये लिव्ह-इन रिलेशनशीपमध्‍ये राहत होते. मागील काही दिवस वैष्‍णव हा लिव्ह-इन पार्टनरच्‍या चारित्र्यावर
संशय घेत होता. यातून दोघांमध्‍ये वाद होत होते. शनिवारी सायंकाळी दोघांमध्‍ये वाद झाला. यावेळी त्‍याने तिला प्रेशर कुकरने मारले. यावेळ झालेल्‍या प्रचंड रक्तस्रावामुळे तरुणीचा मृत्‍यू झाला."

या प्रकरणातील आरोपी वैष्णव याला अटक करण्‍यात आली असून त्‍याच्‍या विरोधात बेगूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news