बंगळूर स्थानकावर उद्यान एक्सप्रेसला आग; कोणतीही जीवितहानी नाही | पुढारी

बंगळूर स्थानकावर उद्यान एक्सप्रेसला आग; कोणतीही जीवितहानी नाही

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुंबई-बंगळूर उद्यान एक्स्प्रेसमधून प्रवासी उतरल्यानंतर रेल्‍वे प्लॅटफॉर्मवर उभी होती. अचानक या काही डब्‍यांना आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बंगळूरच्या क्रांतिवीर सांगोली रायण्णा रेल्वे स्थानकावर उद्यान एक्स्प्रेस सकाळी साडेसातच्या सुमारास थांबली होती. अचानक आग लागली आणि प्लॅटफॉर्मवर धूर पसरला. दोन डब्यांना आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी तात्‍काळ दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

.हेही वाचा 

Journalist Murder : बिहारमधील पत्रकाराच्या हत्याप्रकरणी चार आरोपींना अटक

ट्रॅव्हल फोटोग्राफीची क्रेझ; प्रवास, भटकंती करत फोटोग्राफी करण्याचा तरुणाईमध्ये ट्रेंड

स्वतंत्र बेरियाट्रिक विभाग सुरू करणारे ससून राज्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय

Back to top button