Stock Market Updates | शेअर बाजारात विक्रीचा मारा! सेन्सेक्स ५५० हून अधिक अंकांनी कोसळला, काय आहे कारण? | पुढारी

Stock Market Updates | शेअर बाजारात विक्रीचा मारा! सेन्सेक्स ५५० हून अधिक अंकांनी कोसळला, काय आहे कारण?

पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स सुमारे ५७१ अंकांनी घसरून ६७ हजारांवर आला. तर निफ्टी २० हजारांच्या खाली घसरला. आज बाजारात विक्रीचा मारा दिसून येत असून एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या हेविवेट स्टॉक्सना फटका बसला आहे. (Stock Market Updates)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्स याधीच्या सत्रात ६७,५९६ वर बंद झाला होता. आज तो ६७,०८० वर खुला झाला. सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेचा शेअर टॉप लूजर ठरला. हा शेअर सुमारे ३ टक्क्यांनी घसरून १,५७५ रुपयांवर आला. रिलायन्सचा शेअर १ टक्क्यांहून अधिक घसरून २,३९४ वर आला. टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्सही लाल चिन्हात गेले आहेत. तर ॲक्सिस बँक, एम अँड एम, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स वाढले आहेत. दरम्यान, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपही घसरले आहेत.

बाजारात विक्रीचा मारा सुरु आहे. फायनान्सियल शेअर्समध्ये अधिक घसरण झाली आहे. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ०.८७ टक्क्यांनी तर निफ्टी बँक ०.६८ टक्क्यांनी घसरला. एफएमसीजी, आयटी, फार्मा, रियल्टी आणि हेल्थकेअर क्षेत्रातही घसरणीचा ट्रेंड दिसून येत आहे. (Stock Market Updates)

गणेश चतुर्थीमुळे मंगळवारी शेअर बाजारा बंद होता. तर गेल्या सोमवारी तेजीला ब्रेक लागला होता.

आशियाई बाजारात कमकुवत स्थिती

यूएस ट्रेझरी उत्पन्न १६ वर्षांच्या उच्चांकावर गेले आहे. कारण तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढली आहे. यामुळे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह दीर्घकाळ उच्च व्याजदरवाढ कायम ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातील स्टॉक्सना संघर्ष करावा लागत आहे. जपानचा निक्केई ०.२ टक्क्यांनी घसरला आहे.

हे ही वाचा :

Back to top button