अर्थवार्ता

अर्थवार्ता

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 372.40 अंक व 1239.72 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक आजपर्यंतच्या सर्वोच्च विक्रमी पातळीवर म्हणजेच 20192.35 अंक आणि 67838.63 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला. निफ्टीमध्ये 1.88 टक्क्यांची वाढ, तर सेन्सेक्समध्ये 1086 टक्क्यांची वाढ बघायला मिळाली. 'बीएसई'चे भांडवलबाजार मूल्य एकूण 3 लाख 23 हजार कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचले. सप्ताहात सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये बजाज ऑटो (7.79 टक्के), ग्रासीम इंडस्ट्रीज (6.65 टक्के), भारती एअरटेल (5.68 टक्के), अ‍ॅक्सिस बँक (4078 टक्के) यांचा समावेश होतो. तसेच सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन (-24.96 टक्के), गेल इंडिया (-3.28 टक्के), बीपीसीएल (-2.68 टक्के), आयओसी (-2.18 टक्के), हिंदुस्थान युनिलिव्हर (-1.75 टक्के) यांचा समावेश होतो.

ऑगस्ट महिन्यात 15 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर असलेला किरकोळ महागाईदर (सीपीआय) 7.44 टक्क्यांवरून खाली येऊन 6.83 टक्के झाला. जुलै महिन्यात हा महागाईदर 7.44 टक्के होता. अन्नधान्य महागाईदेखील 11.51 टक्क्यांवरून 9.94 टक्क्यापर्यंत खाली आला. सध्या किरकोळ महागाईदर 4 ते 6 टक्क्यांदरम्यान नियंत्रणात राखण्याचे रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट आहे. महागाईसोबतच अर्थव्यवस्थेसाठी दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे औद्योगिक उत्पादन निर्देशांक जुलै महिन्यात मागील पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर 5.7 टक्क्यांवर पोहोचला. या सर्वांची परिणिती निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांक सर्वोच्च पातळीवर पोहोचण्यात झाली.

टाटा स्टील आणि युनायटे किंग्डम सरकारची एकत्रित 1.25 अब्ज पाऊंड (सुमारे 10 हजार कोटींच्या) प्रकल्प गुंतवणुकीची घोषणा पोर्ट टालबोट येथील कोळशावर चालणार्‍या पोलाद उत्पादन प्रकल्पाला आधुनिकीकरणाद्वारे कमी प्रदूषणकारी इलेक्ट्रिक आर्क फर्न्जेस प्रकल्पात रूपांतरित करणार. यामध्ये टाटा समूह 750 दशलक्ष पाऊंड तर ब्रिटिश सरकार 500 दशलक्ष निधी गुंतवणार.

आयात व निर्यात यामधील तफावत दर्शवणारी व्यापारतूट 10 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर ऑगस्ट महिन्यात भारताची व्यापारतूट 24.16 अब्ज डॉलर्सवर पोहचली. ऑगस्ट महिन्यात भारताची निर्यात 6.86 टक्के घटून 34.48 अब्ज डॉलर्स झाली, तर आयात 5.23 टक्के घटून 58.64 अब्ज डॉलर्स झाली. निर्यात वाढवून आयतमूल्य कमी करणे व्यापारतूट कमी करण्यासाठी आवश्यक आहे. या निर्यात वाढीसाठी भारत सध्या रुपया चलन स्वरूपात व्यापार चालू करण्यासाठी जगातील 22 विविध राष्ट्रांशी चर्चा करत आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे डॉलर चलनावरील अवलंबित्व कमी होण्यासाठी मदत होईल.

भारतातील लघू आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना निर्यातीसंबंधी सेवा पुरवण्यासाठी अ‍ॅमेझॉन आणि भारतीय पोस्ट खाते यांच्यामध्ये करार. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'सह-एआय' या प्रणालीची अ‍ॅमेझॉनने घोषणा केली. याद्वारे भारतातील लाखो उत्पादक व विक्रेत्यांना जागतिक बाजारपेठेचे द्वार खुले होणार आहे. भारतीय पोस्ट खात्यासोबतच अ‍ॅमेझॉनने भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक विभागासोबतदेखील करार केला. रेल्वेद्वारे पार्सल पाठवण्यासाठी 'डेडिकेटेड फ्राईट कॅरिडॉर कॉपेरिशन ऑफ इंडिया' या कंपनीद्वारे अ‍ॅमेझॉन आपल्या विक्रेत्यांच्या मालाची वाहतूक करेल. अशी सेवा सुरू करणारी अ‍ॅमेझॉन ही ई-कॉमर्स क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली.

'इन्फोसिसने' जागतिक पातळीवरील कंपनी ठरली. सोबत 1.5 अब्ज डॉलर्सचा करार केला. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) सेवा इन्फोसिस पुरवणार असून, पुढील 15 वर्षांसाठी ही सेवा पुरवली जाईल. अशा प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी इन्फोसिसने केलेल्या करारांचे मूल्य दुसर्‍या तिमाहीत एकूण 5 अब्ज डॉलर्स (40 हजार कोटी)पेक्षा अधिक झाले. इन्फोसिसने आपल्या या ग्राहकाचे नाव सध्यातरी गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

करसंबंधी विवाद हाताळणारे न्यायाधिकरण 'इन्कमटॅक्स अ‍ॅपॅलिट ट्रिब्युनल'ने कर विभागाची कॉगनिझट कंपनीकडे 3300 कोटींची करमागणी ढरु ऊशारपव वैध ठरवली. 2017-18 सालच्या एका समभाग पुनर्खरेदी (शेअर बायबॅक) प्रकरणात करविभागाने लाभांश वितरण करअन्वये (डिव्हिडंट डिस्ट्रीब्यूशन टॅक्स) 3300 कोटींची मागणी केली. कंपनीने याविरोधात मद्रास उच्च न्यायालय तसेच सर्वोेच्च न्यायालयाकडे दाद मागितली; परंतु अखेरीस कॉगनिझट कंपनीला या निर्णयापश्चात सुमारे 2800 कोटी सरकारजमा करावे लागण्याची शक्यता आहे.

कॅाफी डे एंटरप्राईझेसचा 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा निव्वळ महसूल 59 टक्के वधारून 924 कोटींपर्यंत पोहोचला. कॉफी व्यवसायात दिवसाची सरासरी विक्री 42% वधारून 20 हजार 622 कोटी झाली. तसेच कॉफी यंत्रातून (कॉफी व्हेंडिग मशीन) दिवसाला सरासरी येणारा महसूल 65.8% वधारून 431 रुपये झाला. 31 मार्चच्या आकडेवारीनुसार कंपनीवरील कर्ज 1694 कोटींवरून 1524 कोटींवर खाली आले. तसेच कंपनीचे एकूण मूल्य (नेटवर्थ) 11 टक्के घटून 3376 कोटी रुपये झाले.

रिझर्व्ह बँकेचा गृहकर्ज घेणार्‍यांना दिलासा. गृहकर्जाची परतफेड झाल्यानंतर पुढील तीस दिवसांमध्ये बँकेने कर्जदाराची सर्व दस्तऐवज नोंदणीसंबधी सोपस्कर आणि कागदपत्रे परत करणे बंधनकारक असेल. 1 डिसेंबरनंतर हा नियम लागू होणार असून, हा नियम न पाळल्यास बँकेला मुदत संपल्यानंतर कर्जदारास दरदिवशी 5 हजार द्यावे लागणार.

रिलायन्स रिटेल कंपनी व्यवसायवृद्धीसाठी 1.5 अब्ज डॉलर्सचा निधी उभारण्यासाठी प्रयत्नशील. यासाठी कंपनी सध्याचे गुंंतवणूकदार एुळीींळपस खर्पींशीीेीीं सिंगापूरचा जीआसी, अबुधाबी तसेच सौदी अरेबियाचे गुंतवणूकदार यांच्याशी चर्चा चालू आहे.

पीएम गती-शक्तीमार्फत केंद्र सरकारकडून 14 हजार कोटींच्या 6 नव्या महामार्ग तसेच रेल्वेमार्ग उभारणी प्रकल्पांना मान्यता मिळाल्या. यापैकी रस्ते महामार्गासाठी 8706 कोटी, तर रेल्वे मार्गांसाठी 5374 कोटींचा निधी देण्यात आला.

बांधकाम क्षेत्रातील सिग्नेचर ग्लोबल कंपनीचा 730 कोटींचा आयपीओ 20 सप्टेंबररोजी खुला होणार. एकूण 603 कोटींचे नवीन समभाग तसेच 127 कोटींचे इंटरनॅशनल फायनान्स कंपनीचे ऑफर फारसेल समभाग विक्रीसाठी उपलब्ध असतील. 22 सप्टेंबरपर्यंत आयपीओ खुला राहणार असून, 1 रुपया दर्शनीमूल्य आणि किंमतपट्टा 366 ते 385 दरम्यान निश्चित करण्यात आला आहे.

8 सप्टेंबररोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 4.99 अब्ज डॉलर्सनी घटून 593.90 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news