परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा कधी थांबणार? | पुढारी

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा कधी थांबणार?

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफीट अँड वेल्थ प्रा. लि.

लाल रंगात बंद होण्याचा बाजाराचा हा सलग पाचवा आठवडा! शिवाय 19300 या खाली बंद होण्याचाही 30 जून 2023 नंतर निफ्टीचा पहिला दिवस! 44.34 पॉईंटस्नी घसरून निफ्टी 50 (0.23%) 19265.80 वर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 62.15 पॉईंटस्नी घसरून (0.10%) 64886.51 वर बंद झाला. बाजारातील पुन्हा एक कंटाळवाणा, मरगळलेला आठवडा! मिडको आणि स्माल कॅप इंडेक्स माल तेजीत राहिले. ते अनुक्रमे 15 % आणि 2.19 % नी 30717.91 आणि 36055.96 वर बंद झाले.

परदेशी गुंतवणूक संस्था (FII) भारतातील विक्रीचा मारा कधी थांबवणार? गेल्या सप्ताहात FIIs नी 5895.29 कोटींची निव्वळ विक्री केली. देशी संस्थांनी मात्र (DII) सलग पाच दिवस भरघोस खरेदी केली. (रु. 8495 99 कोटी)

यू. एस ग्लोबल बाँडस् हे जगभरतील संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी Safe Heaven समजले जातात. सध्या आणि ते 2007 नंतरच्या उच्चतम पातळीवर (4.36%) आहेत. शिवाय जोपर्यंत व्याज दर कमी करण्यातले कोणतेही संकेत फेड रिझर्व्हकडून मिळत नाहीत, तोपर्यंत ते वाढतच राहतील. अशा परिस्थितीत FILs इथला माल विकून अमेरिकेत गेले नाहीत तरच नवल! हे यू. एस. ट्रेझरी किंवा बाँड यील्डस्खाली येत नाहीत तोपर्यंत भारतातील इक्विटी मार्केटसमधील मरगळ अशीच राहील.

अशा मरगळलेल्या बाजारात गुंतवणूकदारांनी दर्जेदार लार्ज कॅप कंपन्यांचे शेअर्स Accumulate करावेत. Accumulate करणे म्हणजे घसरलेल्या भावात आणखी खरेदी करणे. विशेषत: लार्ज कॅप बँका आणि लार्ज कॅप कॅपिटल गुडस् कंपन्यांचे शेअर्स पाहावेत. एचडीएफसी बँक, एसबीआय, कोटक महिंद्र बँक हे शेअर्स गेल्या एक महिन्यात साडेसहा ते आठ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यांच्यामध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही. भेल, सिमेन्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स हॅवेल्स, थरमॅक्स बीईएमल हे शेअर्स असे तेजीतच असले, तरी त्यांची तेजी वाढू शकते.

लिंडे इंडियाचा (LINDEINDIA) शेअर या सप्ताहात 18 टक्के वाढला. एका महिन्यात तो जवळपास 30 टक्के वाढला आहे. इंडस्ट्रीयल गॅसेसचे उत्पादन करणारी ही एक दर्जेदार कंपनी आहे. तीन वर्षांची सरासरी उत्पन्न वाढ 29 टक्के, तर नफा वाढ 53 टक्के आहे. शेअरचा शुक्रवारचा बंद भाव रु.5851.15 इतका आहे. जिओ फाइनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर 21 ऑगस्ट रोजी बीएसई आणि एनएसईवर अनुक्रमे रु.265 आणि रु. 262 च्या भावाने फलंदाजीस उतरला. परंतु, नंतर 5 टक्के कोसळून रु. 251.75 वर बंद झाला.

इतकेच नव्हे तर पुढील चारही दिवस पाच टक्क्यांच्या लोअर सर्किटचा मानकरी ठरला. जिओमधील हे सेलिंग हे Force Selling आहे. म्हणजे भारतातील इंडेक्स फंडांकडे रु. 2,70,000 कोटी एवढा AUM आहे. या इंडेक्स फंडांना रिलायन्सच्या शेअर्सबरोबर जिओचे शेअर्सही मिळालेले आहेत. परंतु, जिओचा शेअर व निफ्टी 50 इंडेक्सचा 51 वा शेअर झाल्यामुळे तो तात्पुरता इंडेक्सचा भाग असणार आहे. तो इंडेक्समधून काढून टाकण्याच्या आत या फंडांना जिओचे शेअर्स विकून टाकावे लागणार आहेत. आता इंडेक्समधून जिओचा शेअर काढून टाकण्याची प्रक्रिया 29 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. तोपर्यंत जिओमधील घसरण सुरूच राहील. शुक्रवारी हा शेअर 221.60 रुपयांवर बंद झाला. तो 200 रुपयांच्या खाली जाईल, असे वाटते.

गुंतवणुकीसाठी शेअर बाजारात आपण उत्कृष्ट कंपन्यांच्या शोधात असतो. फंडामेंटल अ‍ॅनालिसीसमध्ये त्यासाठी बरीच साधने आहेत. कंपन्यांच्या Fixed Assets मध्ये वाढ हा असाच एक मापदंड आहे. कंपनीच्या Land, plants, Equipments मध्ये वाढ झालेली किंवा होताना दिसत असेल, तर कंपनीच्या विस्तारासाठी Capital Expenditure केला जात आहे, हे स्पष्ट होते. इतर मापदंडांचा वापर करून गुंतवणूकदारांनी असे शेअर्स अभ्यासावेत आणि त्यामध्ये गुंतवणूक करावी. असेच काही दर्जेदार शेअर्स वर टेबलमध्ये दिले आहेत.

Back to top button