चंद्रयान मोहीम : 150 च्यावर उद्योगांत मोठी उत्क्रांती येऊन स्पेस गुंतवणूक वाढेल

चंद्रयान मोहीम : 150 च्यावर उद्योगांत मोठी उत्क्रांती येऊन स्पेस गुंतवणूक वाढेल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर जगातील इतर देशांचे सॅटेलाइट सोडण्याची क्षमता भारतामध्ये आली आहे. मायनस 180 डिग्री सेल्सिअसमध्ये हे रोव्हर काम करणार आहे. आपला एक दिवस म्हणजे चंद्राचे 14 दिवस हे रोव्हर काम करणार आहे. 14 दिवसांनंतर उजेड पडला आणि पुन्हा हे रोव्हर अ‍ॅक्टिव्ह होऊन संदेश देऊ लागले, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्रासह डेटा, सॉफ्टवेअर, बॅकअप इंडस्ट्रीसह 150 च्यावर उद्योगांत मोठी उत्क्रांती होऊ शकते. या यशानंतर इस्रोने बुध व शुक्र ग्रहांवर जाण्याची तयारी आखली असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते.

इस्रोने निश्चित केलेल्या वेळेत भारताने पाठविलेले रोव्हर खडकाळ आणि खड्ड्यात अत्यंत चांगल्या स्थितीत उतरवून मोठे यश मिळविले आहे. आता इस्रो हा जगातील सर्व देशांना व्यावसायिक स्वरूपात सॅटेलाइट लॉन्च करून देण्यास उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर येणार्‍या पिढीला विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी प्रगत करणे, याशिवाय लोक विज्ञानाकडे वाढत गेले, तर माणसांचीदेखील प्रगती कशी यशस्वीपणे होऊ शकते, हे आजच्या चंद्रयान मोहिमेने करून दाखविले आहे. चंद्रावर एका बाजूने स्पेस मिळवली असली तरी भारताने दक्षिण ध्रुव भागात उतरण्याचा मोठा विक्रम केला आहे. जिथे आजपर्यंत कोणीच पोहचलेला नाही. माती वातावरण आणि येथील केमिकलविषयीचा सर्व डाटा गोळा करण्याचे काम हा रोव्हर करणार आहे. विज्ञान तंत्रज्ञानक्षमता आणि विश्वास हे केवळ भारतीय तंत्रच करू शकते, हे जगाला दाखवून दिले.

इतर देशांचे सॅटेलाइट कमी खर्चात…
चंद्रावर स्पेस मिळविणारा पहिला देश म्हणून भारताचे नाव घेतले जाणार आहे. ज्या देशांची क्षमता नाही ते देश आपल्यामार्फत कमी खर्चात त्यांचे सॅटेलाइट सोडण्यासाठी भारताकडे येतील. कारण, अमेरिकेचा खर्च त्यांना परवडणारा नसून त्यापेक्षा भारत कमी रकमेत विश्वासू अन् योग्य क्षमता देऊ शकतो, असा विचार करून सर्व जण येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उद्योगांना स्पेस टुरिझमच उभा राहू शकतो…
चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याने पुढील काळात स्पेस स्टेशनमध्ये राहण्यासाठी काम केले जाणार आहे. गगनयान मोहिमेंतर्गत इस्रोने बुध आणि शुक्र ग्रहावर जाण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे. आतापर्यंत वुई कॅन डू इट म्हणत होतो. मात्र, आता आपण तीच म्हण होईल, असे म्हणण्याची वेळ प्रत्येक भारतीयावर आली आहे. आजच्या मूव्ही उद्योगांना स्पेस टुरिझमच उभा राहू शकतो. चंद्रावरच्या स्पेसमध्ये कुफीसारखी प्रयोगशाळा उभी राहिली आणि त्यानंतर नवनवीन संशोधन करून पाठविले जाण्याचाही मार्ग मोकळा होऊ शकतो.

मायनस 180 डिग्री टेंपरेचरमध्ये रोव्हर राहू शकते तर सोलर पॅनेलच्या मदतीने शुक्र ग्रहावर आणण्यासाठी लाइट पाठविण्याची योजना आखण्यात यश येणार असल्याचे दिसते. चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यामुळे सॉफ्टवेअर बॅकअप इंडस्ट्रीसह अन्य दीडशे उद्योग इंडस्ट्री उभी राहण्यास तयार झाले असल्याचे मत शास्त्रज्ञ सोळंकी जे. के. यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news