वेगवेगळ्या कंपनींचे कोरोना प्रतिबंधक डोस घेणे धोकादायक : डब्ल्यूएचओ | पुढारी

वेगवेगळ्या कंपनींचे कोरोना प्रतिबंधक डोस घेणे धोकादायक : डब्ल्यूएचओ

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : दाेन वेगवेगळ्या कंपनीचे कोरोना प्रतिबंधक डोस घेणे धोकादायक आहे, असा इशारा जागतिक आरोग्‍य संघटनेचे (डब्‍ल्‍यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी दिला आहे. वेगवेगळ्या कोरोना प्रतिबंधक डोस वापराचे कोणते दुष्‍परिणाम होतात, याची माहिती अद्‍याप उपलब्‍ध नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

अधिक वाचा 

संपूर्ण जगात कोरोना महामारीविरोधातील युद्‍ध सुरु आहे. कोरोनावर मात करण्‍यासाठी सध्‍या तरी लस हाच एकमेव पर्याय आहे.कोरोना प्रतिबंधक डोस घेताना नियमांचे पालन व्‍हावे, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

जास्‍तीत जास्‍त नागरिकांना लस देण्‍यासाठी सर्वच देशांमध्‍ये युद्‍ध पातळीवर काम सुरु आहे. यामध्‍येच लसीचा तुटवडाही जाणवत आहे.त्‍यामुळे वेगवेगळ्या कंपनीच्‍या लशींचे डोस घेण्‍याचे प्रमाणही वाढले आहे.

पहिली लस घेतलेल्‍या कंपनीचाच दुसरा डोस घेणे आवश्‍यक आहे.

कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घ्‍यावे लागतात.अनेक देशांमध्‍ये वेगवेगळ्या कंपनींची लस घेण्‍याचे प्रमाण वाढले आहे. मिश्र लसी घेणे हे धोकादायक आहे.वास्‍तविक, वेगवेगळ्या कंपन्‍यांचे लशींचे मिश्रण आणि त्‍याचा वापर हा प्रतिकार शक्‍ती वाढविण्‍यासाठी केला जातो, असे  सौम्‍या स्‍वामीनाथन यांनी म्‍हटलं आहे.

अधिक वाचा 

सध्‍या फायझर, एस्‍ट्रेजेनेका, स्‍पुटनिक या लशींचे दोन डोस दिले जात आहे. तसेच दोन डोसमधील अंतर लस कंपनीनुसार वेगवेगळे आहे.

स्‍पूटनिक व्‍ही आणि जॉन्‍सन अँड जॉन्‍सन या कंपनीची एकच लस आहे. प्रत्‍येक देशातील नागरिकच डोस घेण्‍याबाबत स्‍वत:च निर्णय घेत आहे. यामध्‍ये लसीकरण नियमांचे पालन होत नाही. हे चुकीचे आहे, असेही सौम्‍या स्‍वामीनाथन यांनी सांगितले.

सध्‍या तरी दोन वेगवेगळ्या लशींचा वापराच्‍या दुष्‍परिणामाबाबत वस्‍तुनिष्‍ठ माहिती मर्यादित आहे. यावर संशोधन सुरु आहे. त्‍याचे निष्‍कर्ष कोणते येतात हे पाहणेही महत्त्‍वाचे ठरणार आहे.

नागरिक स्‍वत:च डोस घेण्‍याबाबत निर्णय घेणार असतील तर सर्वत्र अराजक परिस्‍थिती निर्माण होईल, अशी भीतीही त्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

सध्‍या तरी कोरोना बुस्‍टर डोस संदर्भातील आकडेवारी उपलब्‍ध नाही.

बूस्‍टर डोस किती देण्‍यात यावेत. तसेच दोन लस घेतल्‍यानंतर पुन्‍हा केव्‍हा लस घ्‍यावी, याचीही माहिती नाही,असेही ते म्‍हणाले.

संपूर्ण जगभरात लशींच्‍या डोसचे समान वितरण व्‍हावे, अशी अपेक्षाही सौम्‍या स्‍वामीनाथन व्‍यक्‍त केली आहे.

हेही वाचलं का ?

व्‍हिडिओ पहा : गरीब मुलांच्‍या चेहर्‍यांवर हास्‍य फुलविणारा जोकर

 

Back to top button