हेमांगी कवी ट्रोलर्सना म्हणते, बाई… बुब्स आणि ब्रा… | पुढारी

हेमांगी कवी ट्रोलर्सना म्हणते, बाई... बुब्स आणि ब्रा…

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : हेमांगी कवी मराठमोळी अभिनेत्री तिच्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आणि टेलिव्हिजन विश्वात प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. हेमांगी कवी सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.

अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेमांगी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत असते. कवीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओवर तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय.

अधिक वाचा :

मात्र हेमांगीने एक पोस्ट शेअर करत या नेटकऱ्यांची बोलती बंद केलीय.

May be an image of 1 person and smiling

हेमांगी कवीने कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. ती म्हणाली, “हो मला स्तन आहेत. त्याला स्तनाग्रेही आहेत अगदी पुरुषांसारखी! जसे चालताना माझे हातपाय हलतात तसचे काम करताना माझे स्तन हलतात.

मी सस्तन प्राणी आहे. मादी आहे! ज्यांचे हलत नाहीत अशांना माझा त्रिवार सलाम. आता मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची कि नाही ही माझी पंसत आहे.”

काय म्हणाली फेसबूक पोस्टद्वारे हेमांगी कवी

या निमित्ताने सांगावसं वाटतं… ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा social media वर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या image चा जो काही संबंध जोडला जातो.

अधिक वाचा : 

स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती struggle करायचाय हे लक्षात येतं! आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असतानाही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!” असा प्रश्न हेमांगीला पडला आहे.

“Tshirt मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा for that matter कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती natural पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना! मग हेच स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी!

अधिक वाचा : 

hemangi kavi

ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या comfortable आहेत त्यांनी ती जरूर घालावी, मिरवावी anything! Their choice! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं?” असाही प्रश्न हेमांगी कवीने उपस्थित केला आहे.

लोक काय म्हणतील

“किती तरी मुली ब्रा घालूनही nipples दिसतात म्हणून काय काय उपद्व्याप करतात… 2 2 ब्रा घालतात, nipple area ला tissue paper लावतात, nipple pads वापरतात, चिकट पट्टी लावतात… बाप रे!…कशासाठी एवढं आणि का? किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही ‘लोग क्या कहेंगे’ या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात.

कामावरून, बाहेरून आल्यावर ज्या पद्धतीने मुली ब्रा काढून मोकळा श्वास घेतात ते जर त्याच ‘लोग क्या कहेंगे’ लोकांनां दाखवलं ना तर मुलींची दयाच येईल हो!” अशी खंतही तिने व्यक्त केली आहे.

तरीही ब्रा घालायचा का?

May be an image of 1 person and smiling

“स्वतःच्या घरात असतानाही घरच्यांसमोर दिवसभर ती ब्रा घालून राहायचं आणि मग रात्री झोपेच्या वेळी ‘काढण्याची मुभा’ दिल्या सारखी काढून ठेवायची!

त्यावेळीही अंगावर ओढणी नाहीतर स्टोल असतोच! कश्यासाठी यार! बाहेरच्या लोकांचं सोडून देऊ पण घरातले स्वतःचे वडील, भाऊ यांच्यासमोर पण ती ब्रा घालून राहायचं का?

त्याच बापाने मुलीला लहानपणी पूर्ण नग्न अवस्थेत

पाहिलेलं असतं ना? मोठ्या किंवा लहान भावानं पाहिलेलं असतं मग मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे अवयव वाढल्यावर, त्यांचे अवयव असे मनाविरुद्ध बांधून, झाकून, लपवून ठेवायची काय गरज?

ते वाढलेले अवयव जर घरातल्या पुरुषांच्या मनावर परिणाम करत असतील तर तो prob त्या पुरुषांचा आहे!” असं मत हेमांगीने व्यक्त केलं आहे.

आम्ही घरात ब्रा कधीच घालत नाही

“आमच्या घरात आम्ही घरात असताना ना कधी माझ्या मोठ्या बहिणीने ब्रा घातली ना मी घालत! माझ्या घरात माझे बाबा, मोठा भाऊ, गावाला गेले तर सर्व चुलते, चुलत भाऊ थोडक्यात घरातल्या सर्व पुरुषांसमोर आम्ही without ब्रा वावरतो! आम्हांला असं पाहून ना त्यांचे कधी विचार बदलले ना नजर! ना माझ्या आई मार्फत आम्हांला हे सांगण्यात आलं कारण आमच्याशी असलेलं नातं ‘त्यांच्या’ डोक्यात पक्कं आहे!

hemangi kavi
हेमांगी कवीचे ट्रोलर्सना उत्तर

आमची लग्न झाल्यावर ही काही बदललं नाही! बाहेर जाताना, लोकांसमोर किंवा जेव्हा कधी वाटेल तेव्हाच ब्रा वापरली, वापरतो!

याचा माझ्या संस्कारांशी किंवा उगीचच पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करण्याचं फॅड वगैरे म्हणून अश्या कुठल्याच गोष्टींशी काही संबंध नाही!” असं स्पष्ट मत हेमांगीने व्यक्त केलं आहे.

“अरे किती ती बंधनं? किती ते ‘लोक काय म्हणतील’ चं ओझं व्हायचं? अबे जगू द्या रे मुलींना, मोकळा श्वास घेऊ द्या! खरंतर हे सर्वात आधी स्त्रियांनीच आपल्या मनावर बिंबवून घ्यायला हवं!

स्वेच्छेने Without ब्रा वावरणे , दिसणारे nipples बघण्याची सवय करून घ्यायली हवी आणि तेवढीच ती द्यायला ही हवी!” असं ठणकावून हेमांगी सांगते.

हे ही वाचा :

 

Back to top button