

चंद्रपूर; पुढारी वृत्तसंस्था : गॅस गळती झाल्याने चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर येथे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला. गॅस गळती झाल्याची ही दुर्घटना मंगळवारी पहाटे घडली.
दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्या कुटुंबातील सहा जणांवर काळाने घाला घातला. अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) अशी मृतांची नावे आहेत. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. या घटनेमुळे दुर्गापुरात शोककळा पसरली आहे.
अधिक वाचा
पहाटेच्या गॅसगळती झाली. लष्कर कुटुंबातील सातजण बेशुद्ध पडले. ही घटना उघडकीस आल्यानंतर सातही जणांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
उपचारापूर्वीच सहा जणांचा मृत्यू झाला होता. एका सदस्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.
चंद्रपूर शहरालगतच्या दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या पुन्हा एका महिला सदस्याचा मृत्यू झाला आहे.
दासू रमेश लष्कर या असे मृत महिलेचे नाव आहे. मृतांमध्ये आता एकूण 7 जणांचा समावेश झालेला आहे. सकाळी घटना उघडकीस आली त्यावेळी लष्कर कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे.
यात दासू रमेश लष्कर ही महिला जिवंत असल्याने तिला सर्व प्रथम चंद्रपुरात आणि त्यानंतर नागपुरात हलविण्यात आले.
उपचारादरम्यान दासू रमेश लष्कर या महिलेचाही नागपुरात मृत्यू झाला आहे.
या घटनेत मृतांचा आकडा सात वर गेलेला आहे.
हेही वाचलं का?