हवालाच्या प्रकरणांत गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण ९३ टक्के | पुढारी

हवालाच्या प्रकरणांत गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण ९३ टक्के

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  गत नऊ वर्षांच्या कालावधीत हवालाच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण 93 टक्के इतके असल्याची माहिती केंद्र सरकारकडून सोमवारी लोकसभेत देण्यात आली. ईडीमधील सध्याची रिक्त पदे 25 टक्के इतकी असल्याचेही अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मागील 9 वर्षांच्या कालावधीत हवालाची 31 प्रकरणे निकाली लागली आहेत. यातील 29 प्रकरणात 54 आरोपींवरील गुन्हे शाबीत झाले आहेत. थोडक्यात गुन्हे सिद्ध होण्याची सरासरी 93 टक्के इतकी असल्याचे चौधरी यांनी नमूद केले.
हेही वाचा 

Back to top button