मणिपूरमध्ये दोन तरुणींचा बलात्कार करून खून; आणखी एक गुन्हा नोंद | Manipur another FIR on rape

मणिपूरमध्ये दोन तरुणींचा बलात्कार करून खून; आणखी एक गुन्हा नोंद | Manipur another FIR on rape
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूर येथे दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्काराची घटनेचा प्रकार उघडीस आल्यानंतर दोन महिलांवर बलात्कार करून खून करण्यात आल्याची आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. या घटनेची मूळ तक्रार (झिरो एफआयआर) १६ मे रोजी सैकुल पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती. ही एफआयआर आता संबंधित पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे.  (Manipur another FIR on rape)

मृत तरुणींपैकी एका तरुणीच्या आईने ही तक्रार दाखल केली आहे.

इम्फाल पूर्वी येथील एका कार वॉशिंग कंपनीत या दोन तरुणी काम करत होत्या. या परिसरात त्या भाड्याने राहात होत्या. तेथे त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांची निर्दयरीत्या हत्या करण्यात आली, असे या तक्रारीत म्हटले आहे. १०० ते २०० जणांच्या जमावाने हा गुन्हा केला, असेही तक्रारीत नमुद आहे.  काही दिवसांपूर्वी ही तक्रार पोरोपट पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली. द इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.

या तरुणींवर दोन तास अत्याचार | Manipur another FIR on rape

एका पीडितेच्या चुलत भावाने पोलिसांनी फक्त एकदाच संपर्क केला, त्यानंतर आमच्या तक्रारीचे पुढे काय झाले हे समूज शकलेले नाही, असे सांगितले आहे. "दोन्ही तरुणी एकाच गावातील होत्या. त्यांच्या सोबत अन्य एक महिलाही राहात होती. तिच्याकडून आम्ही घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. दंगलखोर जमावाने या दोन तरुणींना फरफटत नेले. या तरुणींच्या तोंडात कापडाचे बोळे कोंबण्यात आले होते. या तरुणींना एका खोलीत डांबून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. जमाव तेथून गेल्यानंतर ही महिला त्या खोलीत गेली तेव्हा दोन्ही तरुणी मृतावस्थेत होत्या. माझ्या बहिणीचे केस ही कापण्यात आले होते."

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news