मणिपूर हिंसाचार : महिला अत्याचार व्हिडिओ प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक | पुढारी

मणिपूर हिंसाचार : महिला अत्याचार व्हिडिओ प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक

पुढारी ऑनलाइन डेस्क : मणिपूर हिंसाचारादरम्यान महिलांसोबत घडलेल्या अत्याचारप्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिस सातत्याने छापे टाकत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध केला. त्याचबरोबर यातील सर्व आरोपींना पकडून कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही या आरोपींना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

गेल्या २४ तासांत मणिपूर राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी लोकांनी शांततेत निदर्शने केली. पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण १२६ चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४१३ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी स्थानिक लोकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.

मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पोलिसांना विशेष सूचना दिल्या होत्या. या प्रकरणात आतापर्यंत काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर इतर अनेक आरोपींना अटक व्हायची आहे, असे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सांगितले होते.

हेही वाचा : 

Back to top button