Manipur Women Assaulted : मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर ४० जणांकडून लैंगिक अत्याचार | पुढारी

Manipur Women Assaulted : मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर ४० जणांकडून लैंगिक अत्याचार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Manipur Women Assaulted : मणिपूरमध्ये गेली काही महिने सुरू असलेल्या हिंसाचारात महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले असल्याचे समोर येत आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर याचे पडसाद देशभर उमटू लागले असतानाच महिलांवर अत्याचाराच्या आणखी घटना पुढे येऊ लागल्या आहेत. यामध्ये महिलांवर सामूहिक बलात्काराची प्रकरणे अधिक आहेत.

या संदर्भातील तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगाकडे १२ जूनला प्राप्त झाल्याचे स्पष्ट होत आहे. इंडिया टुडेने या संदर्भात बातमी दिली आहे. महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे.. Manipur Women Assaulted

Manipur Women Assaulted : ४ मे २०२३ – महिलांना विवस्त्र करून धिंड आणि सामुहिक बलात्कार

कांगपोक्पी जिल्ह्यातील एक गावात कुकी समुदायातील २ महिलांना विवस्त्र करून त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. तसेच त्यांना मारहाण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ १९ जुलैला व्हायरल झाला. त्यानंतर संपूर्ण देशात याचे तीव्र पडसाद उमटले. या महिला सध्या रिलिफ कँपमध्ये आहेत.

४ मे २०२३ – दोन तरुणींवर ४० जणांकडून लैंगिक अत्याचार

कुकी समुदायतील २२ वर्षांची एक तरुणी आणि तिची मैत्रिण हिच्यावर मेईतेई समुदायातील ४० लोकांनी लैंगिक अत्याचार केले. या तरुणी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत.

५ मे २०२३ – दोन महिलांवर बलात्कार करून खून

कांगपोक्पी जिल्ह्यातील एका गावात दोन महिलांवर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला. कोमुंग ममांग परिसरात ही घटना घडली. मेईतेई समुदायातील पुरुषांनी या महिलांना दोन तास एका खोलीत कोंडून ठेवले होते. जेव्हा ही खोली उघडण्यात आली, तेव्हा या महिलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

Manipur Women Assaulted : १५ मे २०२३ – अपहरण करून बलात्कार

इम्फाळ येथून एका १८ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. या मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

हे ही वाचा :

Back to top button