

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मिर मधील कटारा भागात बुधवारी दोन वाजून २० मिनिटांच्या दरम्यान भुकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल मोजली गेली आहे. गेल्या २४ तासात दोनदा जम्मू-काश्मिरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. (Earthquake in Jammu and Kashmir) आज झालेल्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे अद्याप स्सष्ट झालेले नाही.
गेल्या २४ तासात दोनदा जम्मू-काश्मिरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. मंगळवारी (दि.१३) दुपारी १.३३ वाजता ५.४ तीव्रतेचा भूकंप झाला.ज्याचा केंद्रबिंदू सहा किलोमीटर खोलीवर होता. डोडाच्या भदेरवाह शहरात भूकंपामुळे काही इमारतींना तडे गेले आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या एका वॉर्डमध्ये छत रुग्णांवर पडला. रूग्णांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले असून त्यांच्यावर रूग्णालयातील आपत्कालीन कक्षात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचबरोबर दिल्ली आणि शेजारी देश पाकिस्तानसह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
भदेरवाहचे रहिवासी अझीम मलिक यांनी पीटीआयला सांगितले की, भूकंपामुळे त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. "हा जोरदार भूकंप होता आणि माझ्या घराला भेगा पडल्या आहेत,"डोडापासून १५० किमी अंतरावर असलेल्या हिमाचल प्रदेशातील चंबा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. शिमला येथील रहिवासी नंदिनी म्हणाल्या, "भूकंपामुळे माझ्या स्वयंपाकघरातील वस्तू हादरत होत्या." पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, परंतु अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
हेही वाचा