Vladimir Putin vs Yevgeny Prigozhin : रशियांतर्गत संघर्ष – पुतीन यांच्या मुळावर उठला त्यांचाच स्वयंपाकी! | पुढारी

Vladimir Putin vs Yevgeny Prigozhin : रशियांतर्गत संघर्ष - पुतीन यांच्या मुळावर उठला त्यांचाच स्वयंपाकी!

मॉस्को; वृत्तसंस्था : दशकापूर्वी येवगेनी प्रिगोझीन यांचे मॉस्कोबाहेर एक रेस्टॉरंट होते. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन तेथे वरचेवर जेवायला जात. येवगेनी स्वत: पुतीन यांच्यासाठी वेगवेगळ्या डिशेस बनवत आणि ते आले म्हणजे स्वत:च वेटरची भूमिका बजावत. हेच येवगेनी पुढे पुतीन यांच्या गळ्यातील ताईत बनले. आता या येवगेनींनाच रशियाची सत्ता बळकावण्याची घाई झालेली आहे. (Vladimir Putin vs Yevgeny Prigozhin)

येवगेनी आज एका बलाढ्य उद्योग समूहाचे मालक असले, तरी पुतीन यांचा स्वयंपाकी, वाढपी अशीच त्यांची रशियाभरात ओळख आहे. हा वाढपीच आता पुतीन यांच्या पतनाची आणि त्याचवेळी त्यांचे पाट ओढून घेण्याची संधी शोधत आहे. (Vladimir Putin vs Yevgeny Prigozhin)

पुतीन यांच्या आशीर्वादाने प्रिगोझीन यांचे मोठे औद्योगिक साम्राज्य रशियात उभे राहिले. प्रिगोझीन यांच्या व्हॅगनर ग्रुपने खासगी सैन्यही उभे केले. युक्रेन युद्धात मोठी जबाबदारी व्हॅगनर समूहाचे सैन्य पार पाडत आहे. आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची हे खासगी सैन्य रशियन सैन्यात विलीन करण्याची इच्छा आहे. (Vladimir Putin vs Yevgeny Prigozhin)

संरक्षण मंत्री सर्जेई शोईगू यांनी तसे आदेशही जारी केलेले आहेत; पण याच येवगेनी प्रिगोझीन यांनी त्याला केराची टोपली दाखविली आहे. युक्रेनविरोधात रशियन सैन्यासह रशियातील अनेक खासगी सैन्य कंपन्यांचे सैनिक रशियाच्या बाजूने लढत आहेत. या सर्व खासगी सैनिकांना नव्या आदेशानुसार रितसर रशियन सैन्यात सामील व्हावे लागेल. सर्व खासगी कंपन्यांशी तसा करारही संरक्षण मंत्रालय करणार आहे. मात्र, देशातील सर्वात बडी सैन्य कंपनी असलेल्या येवगेनी प्रिगोझीन यांच्या व्हॅगनर समूहानेच त्याला नकार दिला आहे.

येवगेनीही आक्रमक, युक्रेनही आक्रमक म्हणून रशियाला हवे आहे स्वत:चे सैन्य!

  • संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांना लष्कर हाताळता येत नाही, अशी टिप्पणी येवगेनी यांनी या नकारासह केली आहे.
  • येवगेनी यांच्या उद्दामपणावर रशियाच्या कोणत्याही मंत्र्याने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
  • येवगेनींच्या व्हॅगनरने गेल्या महिन्यात युक्रेनमधील बाखमुतवर ताबा मिळविला होता.
  • त्यासाठीच्या युद्धात येवगेनींचे एक लाखावर सैनिक मारले गेल्याचा दावा अमेरिकेने केला होता.
  • येवगेनी यांनी तेव्हाही रशियन सरकारवर हवी ती शस्त्रे आणि दारुगोळा न पुरविल्याचा आरोप केला होता.
  • एका वृत्तानुसार, युक्रेनने डोनेस्टकभागातील रशियाच्या ताब्यातील 3 गावे मुक्त केली आहेत.
  • युक्रेननेही बचावात्मक धोरण सोडून आक्रमक पवित्रा घेतल्याने रशियाला अधिक सैनिक हवे आहेत.

अधिक वाचा :

Back to top button