Press Conference of BJP : मोदी सरकारची ९ वर्षे पूर्ण, भाजपची सोमवारी प्रत्येक राज्यात पत्रकार परिषद | पुढारी

Press Conference of BJP : मोदी सरकारची ९ वर्षे पूर्ण, भाजपची सोमवारी प्रत्येक राज्यात पत्रकार परिषद

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोदी सरकार सत्तेत येऊन सोमवारी ९ वर्षे पूर्ण होणार आहेत. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून सोमवारी (दि.२९) पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्र्यांकडून देशातील प्रत्येक राज्याच्या राजधानीत ही पत्रकार परिषद घेण्यात येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, या पत्रकार परिषदेत भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्रीही संवाद साधतील. या पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधण्यात येणार आहे. शिवाय, गेल्या ९ वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही. अशा राज्यात तेथील प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री पत्रकारांशी संवाद साधतील. (Press Conference of BJP)

कोणत्या राज्यात कोणते केंद्रीय मंत्री घेणार पत्रकार परिषद?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन मुंबईत पत्रकार परिषद घेतील. क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर अहमदाबादमध्ये, मीनाक्षी लेखी बेंगलोरमध्ये, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी लखनौमध्ये, रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव गुवाहाटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. भाजपने प्रत्येक राज्यात पत्रकार परिषद घेण्यासाठी वेगळे मंत्री नेमले आहेत. (Press Conference of BJP)

पंतप्रधान मोदींनी एक ट्वीट केले आहे. मोदी या ट्वीटमध्ये म्हणतात, आज भाजपच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत विधायक बैठक झाली. आम्ही विकासाला गती देण्यासाठी आणि आमच्या नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. मोदींनी भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. (Press Conference of BJP)

या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, नागालॅन्डचे उपमुख्यमंत्री यानथुंगो पॅटन, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान तसेच त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा उपस्थित होते. (Press Conference of BJP)

हेही वाचलंत का?

Back to top button