BJP MP Ratanlal Kataria : भाजप खासदार रतनलाल कटारिया यांचे ७२ व्या वर्षी निधन 

BJP MP Ratanlal Kataria : भाजप खासदार रतनलाल कटारिया यांचे ७२ व्या वर्षी निधन 
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंबाला येथिल खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रतन लाल कटारिया यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, चंदीगड येथील सरकारी रुग्णालयात निधन झाले, अशी माहिती त्यांच्या पत्नी बंतो कटारिया यांनी दिली. ते आपल्या राजकीय कारकिर्दीत तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. (BJP MP Ratanlal Kataria)

BJP MP Ratanlal Kataria : शेवटच्या क्षणीही त्यांची इच्छाशक्ती प्रबळ 

खासदार रतन लाल कटारिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री ट्विट करत म्हणाले, "माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि अंबालाचे खासदार श्री. रतनलाल कटारिया यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. काल रात्रीच मी पीजीआय चंदीगडमध्ये कटारियाजींना भेटलो, त्यांच्या शेवटच्या क्षणीही त्यांची इच्छाशक्ती खूप प्रबळ होती. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो. ईश्वर कटारिया जी यांच्या पवित्र आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो."

आज (दि.१८) दुपारी १२ वाजता चंदीगड येथील मणिमाजरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news